Health Workers Protest In Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये (Ahilyanagar) आरोग्य कर्मचाऱ्यांचा संताप उफाळला आहे. शासनाने दुर्लक्ष केल्याने कर्मचाऱ्यांनी आता जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर थेट ‘जागरण गोंधळ’ आंदोलन सुरू केले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तब्बल दहा वर्षे सेवा करूनही कायमस्वरूपी समायोजन न झाल्याने हे कर्मचारी संतप्त झाले आहेत. गेल्या सहा दिवसांपासून ते बेमुदत आंदोलन (Health Workers Protest) करत आहेत. […]