तुम्हीही खाताय व्हायरल दुबई चॉकलेट? निर्माण होऊ शकतो लिव्हर डॅमेज ते कॅन्सरपर्यंतचा धोका

तुम्हीही खाताय व्हायरल दुबई चॉकलेट? निर्माण होऊ शकतो लिव्हर डॅमेज ते कॅन्सरपर्यंतचा धोका

Eating viral Dubai chocolate It can cause risks ranging from liver damage to cancer : सध्या दुबईमधील एक चॉकलेट प्रचंड व्हायरल होत आहे लोकांमध्ये याची प्रचंड क्रेज निर्माण झाली आहे. मात्र या चॉकलेटमुळे आरोग्या संबंधी अनेक धोके निर्माण होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही जर हे चॉकलेट खात असाल किंवा खाण्याचा विचार करत असाल तर सावधान पाहुयात या चॉकलेटमुळे नेमक्या कोणत्या आजारांचा धोका संभवतो?

मुस्लिम विरोधी वक्तव्यावरून अबू आझमी आक्रमक; नितेश राणेंवर कारवाई करण्याची मागणी

सध्या सर्वत्र व्हायरल होत असलेल्या दुबई चॉकलेटने जगभरात धुमाकूळ घातलाय. पिस्ता. कदायफ आणि तिळाचा सॉस असं सर्व वापरून हे आकर्षक दुबई चॉकलेट बनवण्यात आलं आहे. या चॉकलेटला सर्व मध्य-पूर्व देशांमध्ये निर्माण होणाऱ्या वस्तूंपासून खास करण्यात आला आहे. यामध्ये तुर्की बकलावा आणि कुनाफा पायासारखे डेझर्ट वापरण्यात आले आहे.

न्यायमूर्ती बी.आर. गवई होणार देशाचे नवे सरन्यायाधीश, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली मंजुरी

हे सर्व पौष्टिक पदार्थ वापरून देखील हे चॉकलेट आरोग्यास हानिकारक असल्याचं तज्ञांकडून सांगण्यात येत आहे. कारण जगभरात या चॉकलेटची मागणी वाढल्यानंतर या चॉकलेटमध्ये भेसळ केली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. कारण चॉकलेटमध्ये एफ्लाटॉक्सिन आढळून आले आहे. हा बुरशीतून निर्माण होणारा विषारी पदार्थ आहे.

धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय राजेंद्र घनवट यांच्या जमिनींची चौकशी; SIT स्थापन, अंजली दमानियांच्या मागणीची दखल

विशेषतः अयोग्य पद्धतीने साठवलेल्या पिस्तामध्ये ही बुरशी तयार होते. त्यामुळे डॉक्टरांचं म्हणणं आहे की, एफ्लाटॉक्सिन त्यामुळे गंभीर आरोग्याचा समस्या निर्माण होऊ शकतात. ज्यामध्ये लिव्हर डॅमेज होणे ते थेट कॅन्सर पर्यंतच्या घातक आजारांचा धोका संभवतो.त्याचबरोबर लोकांच्या आवडीनुसार या चॉकलेटमध्ये वेगवेगळे फ्लेवर आणण्यासाठी अनेक निर्मात्यांकडून तीळ किंवा तत्सम पदार्थ वापरले जातात. ज्यामुळे पोटाच्या समस्या, अंगावर पित्त उठणे याचा देखील धोका निर्माण होतो.

गोरेंची अरेरावी थांबेना! तुझी अवस्था तुषार खरातसारखी करेन म्हणत मंत्री जयकुमार गोरेंची सामाजिक कार्यकर्त्यास धमकी

या महिन्याच्या सुरुवातीला जर्मनीमध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार मध्य-पूर्व देशांमधून आयात करण्यात आलेले दुबई चॉकलेट बार्स यामध्ये हानिकारक घटक आढळून आले आहेत. त्यामध्ये विषारी पामतेल, हिरवे खाद्यरंग आणि कॅन्सर सारखे आजार निर्माण करणारे रसायन आढळून आल्याचा सांगण्यात आलं आहे. स्टटगार्डमध्ये रासायनिक आणि पशुचिकित्सा कार्यालयात करण्यात आलेल्या संशोधनात यामध्ये पामतेलाचे घटक आढळून आले आहेत.

साखर कारखाना घोटाळा…मंत्री राधाकृष्ण विखेंवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

स्वस्त आणि सहज मिळणारे तेल आहे. ज्यामध्ये चरबी आढळून येते. ज्यामुळे हृदयरोग आणि कॅन्सर संबंधित आजार होतात. त्याचबरोबर या चॉकलेटमध्ये कॅन्सरला कारणीभूत असणारे थ्री-एमसीपीडी देखील आढळून आले आहे. तर साल्मोनेला हे जंत जुलाब, हिवताप आणि पोट दुखीचे कारण ठरतात. हे चॉकलेट ‘कॅन्ट गेट कनाफे ऑफ इट’ या नावाने देखील ओळखले जाते. थासारा हामौदादुबई या ठिकाणी राहणाऱ्या ब्रिटिश आणि मिस्त्र येथील चॉकलेट निर्माते यांनी गर्भावस्थेतील चॉकलेट खाण्याची इच्छा शांत करण्यासाठी वापरलं होतं त्यानंतर या चॉकलेटने जगभरात धुवाकूळ घातलाय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube