महाविकास आघाडीच्या काळात मला अडकवण्यासाठी पोलीस आयुक्तांना बसवलं होतं असा खळबळजनक दावा फडणवीसांनी केला आहे.
माहिती तंत्रज्ञान नियम 2021 च्या नियमावलीला आव्हान देत, मेटाने दिल्ली उच्च न्यायालयात व्हॉट्सॲपबाबत आपली बाजू मांडली.
"हे म्हातारं लय खडूस. तिजोरीची किल्ली कंबरेला लावून फिरतय. दादाच्या लक्षात आल्याने ते महायुतीसोबत आले असं सदाभाऊ खोत म्हणाले.
आपले विचार कायम ठेऊन भाजपसोबत जाऊ असा प्रस्ताव शरद पवारांसमोर ठेवला. पण त्यांनी भूमिका बदलल्या असं अजित पवार म्हणाले.
नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीत रस्सीखेच सुरु आहे. छगन भुजबळांच्या माघारीनंतरही राष्ट्रवादीचा या जागेवर दावा कायम आहे. आता नाशिकच्या जागेबाबत एकनाथ शिंदेंनी मोठं वक्तव्य केलंय.
बारामती लोकसभा मतदारसंघात शेवटच्या दोन-तीन दिवसांत धनशक्ती आणि दडपशाहीचा वापर होईल असा खळबळजनक दावा सुनंदा पवार यांनी केला आहे.
बाह्य अवकाश करारावरील संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावाला व्हेटो केल्याने अमेरिकेने रशियावर टीका केली आहे. रशियाचं मत व्होटो विरोधात.
संगमनेरमधील हनुमान जयंतीमध्ये पोलिसांनी मोठी मिरवणूक काढली. त्यावर समाजवादी जन परिषदेने आक्षेप घेत कारवाईची मागणी केली.
नगर दक्षिणचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचार सभेत बोलताना शरद पवार यांची विरोधकांवर जोरदार टीका. लंकेंना मतदान करण्याचंही केलं आवाहन.
निलेश लंके यांच्य प्रचारार्थ सभेत बोलताना प्राजक्त तनपुरे यांनी नाव न घेता सुजय विखे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.