महाविकास आघाडीचा सर्वात मोठा निर्णय; विधानसभा जागावाटपात वंचित आघाडीला ‘नो एन्ट्री’

महाविकास आघाडीचा सर्वात मोठा निर्णय; विधानसभा जागावाटपात वंचित आघाडीला ‘नो एन्ट्री’

Maharashtra Assembly Elections : लोकसभा निवडणुकांवेळी अनुभव चांगला राहिला नसल्याने आता (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडीने सावध पवित्रा घेतला आहे. वंचित बहुजन आघाडी सोबतच्या वाटाघाटींमध्ये महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा महत्वाचा असा एक महिना निघून गेला. त्यामुळे तो अनुभव लक्षात घेता महाविकास आघाडीने मोठा निर्णय घेतला आहे. (Maharashtra Assembly) आगामी विधानसभा निवडणुकीत वंचितसोबत (Vanchit) चर्चाही करायची नाही. वंचितसाठी महाविकास आघाडीचे दरवाजे बंद आहेत अशी थेट भूमिका महाविकास आघाडीने घेतली असल्याचं महाविकाआघाडीच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितलं आहे.

आजपासून विद्यमान विधानसभेचं अखेरचं अधिवेश; विरोधक आक्रमक, वादळी चर्चा होण्याची शक्यता

चर्चाही करायची नाही

वंचित बहुजन आघाडीला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान महाविकास आघाडीतर्फे सहभागी होण्यासाठी निमंत्रण पाठवण्यात आलं. अनेक अटी-शर्थी ठेवून वंचितचे नेते मविआच्या बैठकीत सहभागी झाले. त्यानंतर अनेच चर्चाही झाल्या. या चर्चांमध्ये संपूर्ण फेब्रुवारीचा महिना जागावाटपावरुन चर्चा करण्यातच गेला. त्यावर त्यांनी काही जागांचा प्रस्ताव ठेवला. चर्चा करून तोही सोडवला. परंतु, अखेर, वंचितने जागावाटपाचा मुद्दा पुढे करून आघाडी न करता वेगळ लढण्याचा निर्णय घेतला. हा सगळा अनुभव पाहता विधानसभेला महाविकास आघाडीने आता वंचितसोबत चर्चाही करायची नाही असा निर्णय घेतला आहे.

महावि एकत्र राष्ट्रपती आज संसदेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार; राज्यसभेच्या अधिवेशनाला आज सुरूवात

वाटाघाटी सुरू असतानाच वंचितने आपण २७ जागांवर चाचपणी करत असल्याचंही जाहीर केलं होतं. पुढे, त्यांनी आपल्याला सन्मानजनक वागणूक देत नसल्याचं सांगत वंचितने एक-एक करत राज्यात ३६ हून अधिक जागांवर आपले उमेदवार उभे केले. त्यांच्या या वागण्यामुळे चर्चेला, जागावाटपाला उशिर झाला. आणि काही जागांवर नुकसानही झालं. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुका अवघ्या तीन महिन्यांवर आल्या असून मविआने वंचितला सोडून या निवडणुका लढविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज