राष्ट्रपती आज संसदेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार; राज्यसभेच्या अधिवेशनाला आज सुरूवात

राष्ट्रपती आज संसदेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार; राज्यसभेच्या अधिवेशनाला आज सुरूवात

President  Will Address Lok Sabha Rajya Sabha Today : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहेत. यामध्ये त्या केंद्र सरकारच्या ५ वर्षांच्या रोडमॅपची रूपरेषा मांडू शकतात. (Lok Sabha) ही बैठक नवीन संसदेत 11 वाजता होणार आहे. सर्व खासदारांना सकाळी 10.30 पर्यंत संसदेत पोहोचण्यास आणि सकाळी 10.55 पर्यंत लोकसभेच्या चेंबरमध्ये येण्यास सांगण्यात आलं आहे. 24 जूनपासून लोकसभेचे अधिवेशन सुरू झाले असून (Rajya Sabha) राज्यसभेचे अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे.

लालकृष्ण अडवाणी यांची अचानक प्रकृती खालावली; दिल्लीतील एम्स रुग्णालयात केलं दाखल

घटनेच्या कलम ८७ नुसार

द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनातून संसदेत पोहोचतील. त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा आणि राज्यसभेचे पीठासीन अधिकारी त्यांचं स्वागत करतील. येथून त्यांना राजदंड ‘सेंगोल’ नेतृत्वाखाली सभागृहा नेलं जाईल. घटनेच्या कलम ८७ नुसार, प्रत्येक लोकसभा निवडणुकीनंतर अधिवेशनाच्या सुरुवातीला राष्ट्रपती संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करतात.

त्यावर नंतर सदस्य चर्चा करतील

राष्ट्रपती मुर्मू आपल्या भाषणात मोदी सरकारच्या मागील दहा वर्षांच्या कार्यकाळावर भाष्य करू शकतात. तसंच, अर्थव्यवस्था, संरक्षण, आरोग्यसेवा, शिक्षण आणि समाजकल्याण अशा विविध क्षेत्रातील कामगिरीचा त्यांच्या भाषणात समावेश असण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती मुर्मू यांच्या अभिभाषणानंतर सत्ताधारी पक्ष संसदेच्या दोन्ही सभागृहात आभाराचा प्रस्ताव सादर करेल. त्यावर नंतर सदस्य चर्चा करतील. पंतप्रधान मोदी 2 किंवा 3 जुलै रोजी आभार प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देऊ शकतात.

गदारोळ होण्याची शक्यता

दुसरीकडे लोकसभेत या वेळी विरोधकांचे संख्याबळ पूर्वीपेक्षा जास्त आहे. अशा स्थितीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या आज संसदेत अभिभाषण करताना विरोधकांकडून गदारोळ होण्याची शक्यता आहे. NEET-UG मधील कथित अनियमितता, UGC-NET रद्द करणं, जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले, देशातील रेल्वे अपघात आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती अशा अनेक मुद्द्यांवर विरोधी पक्ष सरकारला कोंडीत पकडू शकतात.

दुप्पट जागा काँग्रेसने जिंकल्या

नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील (NDA)ला 293 जागा मिळाल्या आहेत. तर, दुसरीकडे या निवडणुकीत विरोधक मजबूत झाले आहेत. विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीने 234 जागा जिंकल्या, ज्यात काँग्रेसच्या 99 जागा आहेत. 2019 मध्ये जिंकलेल्या 52 जागांपेक्षा जवळपास दुप्पट जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज