पुणे – कसबा पोटनिवडणूक (Kasba byelection) लढवण्याची मनसे (MNS) पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. बरेच पदाधिकारी निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. त्यांची मागणी मनसे शहराध्यक्ष म्हणून कोअर कमिटीसमोर मांडली आहे. कोअर कमिटी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासोबत चर्चा करुन निर्णय घेणार आहे, मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर (Sainath Babar) यांनी सांगितले. कसबा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमच्याकडे अजून […]
नवी मुंबई : आपल्या सहकाऱ्यांच्या मनात नाराजी निर्माण होऊ नये याची काळजी घेण्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सक्षम आहेत. आमदार बच्चू कडुंची (Bachchu Kadu) काही नाराजी असेल तर ती दूर करण्याचे काम सहजपणे होईल, असे वक्तव्य वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी माध्यमांशी बोलताना केले. अनिल परब (Anil Parab) यांच्यावरील कारवाई संदर्भात विचारले असता मुनगंटीवार म्हणाले, […]
मुंबई : – महाराष्ट्र शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सन्मानदर्शक महाराष्ट्र भूषण पुरस्काराची (Maharashtra Bhushan Award) रक्कम दहा लाखांवरून २५ लाख रुपये करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. तसेच हा पुरस्कार नव्या स्वरुपात, आणखी दिमाखदार ठरावा यासाठी प्रयत्न व्हावेत असा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीनंतर महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या अनुषंगाने बैठक […]
अहमदनगर : एकाएका मंत्र्यांकडे तीन-तीन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिलीय. त्यामुळे डीपीसीच्या बैठका होत नाहीत. यामुळे जिल्ह्यातील विकास कामे खोळंबली आहेत, असा आरोप आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला. स्वातंत्र पालकमंत्री नसल्याने डीपीसीच्या बैठका होत नाहीत. फक्त 30 टक्के निधी वापरला गेलाय. मार्च जवळ आलाय. आता घाईघाईने एखाद्याला खर्च करायचा असेल तर त्याचा पैसा वाया […]
मुंबई : माढा लोकसभा मतदारसंघातील (Madha Constituency) प्रलंबित जलसिंचन व इतर विषयांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज सकाळी बैठक झाली. यावेळी खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर (Ranjit Singh Naik-Nimbalkar), आमदार जयकुमार गोरे (Jayakumar Gore), शहाजीबापू पाटील (Shahjibapu Patil) आणि जलसंपदा, ऊर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री यांनी पुढील निर्देश दिले. […]
जबलपूर- चार वेळच्या किताब विजेत्या महाराष्ट्र महिला व पुरुष खो खो संघांनी (Kho Kho team) आपले वर्चस्व अबाधित ठेवत खेलो इंडिया युथ गेम्समध्ये (Khelo India Youth Games) मंगळवारी विजयाचा डबल धमाका उडवला. महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी पाचव्या सत्रातील या स्पर्धेत सलग दोन विजय साजरे केले आहेत. जानकी पुरस्कार विजेते जान्हवी पेठेच्या नेतृत्वात राष्ट्रीय खेळाडू प्रीती काळे, […]
अहमदनगर : अभिनेत्री दिपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी त्यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या सहकार्याने मोठा गैरव्यवहार (Corruption) केला आहे, असा आरोप दिपाली सय्यद यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन केले. अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्या ट्रस्टने सांगली येथे ४० जोडप्याचा सामुदायिक विवाह सोहळा व राज्यभवनात कोविड योद्धा पुरस्कार […]
मुंबई : राज्यातील दोन पदवीधर आणि तीन शिक्षक (Vidhan Parishad Election) अशा पाच मतदारसंघात आज शांततेते मतदान झाले असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. नाशिक, अमरावती पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. नाशिक विभागात ४९.२८ टक्के, अमरावती विभागात ४९.६७ टक्के, औरंगाबाद विभागात ८६ टक्के, […]
नवी दिल्ली : भारतीय संघाचा (Team India) सलामीवीर फलंदाज मुरली विजयने (Murli Vijay) सर्व प्रकारच्या क्रिकेटला (Cricket) अलविदा केला आहे. त्याने स्वत: ट्विट करुन निवृत्तीची माहिती दिलीय. 2018 पासून मुरली विजय भारतीय संघातून बाहेर होता. खेळण्यातील सातत्य आणि वाढत्या वयाचा विचार करुन त्याने हा निर्णय घेतला आहे. 38 वर्षीय मुरली विजय भारताकडून तिन्ही फॉरमॅट खेळला […]
नांदेड- खासदार नवनीत राणांना (Navneet Rana) आज न्यायालयाने दिलेला दणका स्वागतार्ह आहे. जात पडताळणी हा विषय खूप गंभीर आहे. ज्यांच्याकडे डुप्लीकेट सर्टिफिकेट असतील त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई करावी, असे माजी मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले. ते नांदेडमध्ये माध्यमांशी बोलत होते. खासदार नवनीत राणा यांना शिवडी कोर्टाने मोठा दणका दिला आहे. जात पडताळणी प्रकरणात नवनीत राणा […]