’83’ फेम साकिब सलीमची नवी इनिंग; नव्या प्रोजेक्टची करणार निर्मिती
Sakib Salim : सुप्रसिद्ध अभिनेता आणि मॉडेल साकिब सलीम (Saqib Salim) हा नेहमीच त्याच्या अनोख्या फिटनेसच्या फंडामुळे (Fitness) जोरदार चर्चेत असतो. मात्र यावेळी तो वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. ते म्हणजे साकिब आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार आहे. त्याचे प्रोडक्शन हाऊस एलीमेन थ्री एंटरटेनमेंट लॉन्च करून चित्रपट निर्मितीच्या जगात पाऊल ठेवणार आहे.
‘हे चुकीचंच, मनोरंजनाला फाशी द्या…’, संसदेत सुरक्षा भंग करणाऱ्या मनोरंजनच्या वडिलांची प्रतिक्रिया
या नव्या प्रोडक्शन हाऊस च्या अंतर्गत अनेक नवनवीन प्रोजेक्ट्स ची निर्मिती होणार असल्याचं कळतंय. नव्या कथा आणि नव्या प्रोजेक्ट ची निर्मिती करण्यासाठी तो सज्ज झाला आहे. आपल्या वैविध्यपूर्ण कामगिरीने प्रेक्षकांना कायम मोहित करणारा साकिब आता सिनेमॅटिक अनुभवांना वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी उत्सुक आहे. त्याच्या प्रॉडक्शन हाऊससह तो अष्टपैलू अभिनेता तर आहेच. आता नव्या इनिंगची सुरुवात करताना तो अजून उत्तम प्रोजेक्ट घेऊन येणार असल्याचं सांगत आहे.
Gautami Patil : ‘मला आरक्षण हवंय’; मराठा आरक्षणावर गौतमी पाटील बोलली…
या डायनॅमिक अभिनेत्याचे काकुडा आणि क्राइम बीटमध्ये काही रोमांचक प्रकल्प आहेत जे ओटीटी रिलीजसाठी तयार आहेत. साकिब सलीम अलीकडे सलमान खानसोबत ‘रेस3’मध्ये दिसला होता. त्याची दुसरी ओळख द्यायची झाल्यास तो अभिनेत्री हुमा कुरेशी हिचा भाऊ आहे. मॉडेल म्हणून साकिबने आपल्या करिअरची सुरूवात केली. मुझसे फ्रेंडशिप करोग, मेरे डॅड की मारूति, बॉम्बे टॉकिज, हवा हवाई, ढिशुम, दिल जंगली अशा अनेक चित्रपटांत तो दिसला आहे.