Raghav Chadha: परिणीतीला डेट करताय का? आपच्या नेत्याने सोडलं मौन

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (96)

नवी दिल्ली : बॉलिवूड आणि राजकारणाचे एकत्रीकरण अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे, यावरून परिणीती किंवा राघव दोघेही याबद्दल बोलले नसले तरी राजकारणात सध्या मोठी चर्चा होत आहे. साहजिकच अनेकांना या दोघांबद्दल प्रश्न निर्माण होत आहेत.

आता राघव चढ्ढा यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. राघव चड्ढा यांनी सांगितले की, मला परिणीती विषयी नको, तर राजकारणाविषयी प्रश्न विचारा असे तो म्हणाला. तसेच ते आज पुन्हा एकदा एकत्र मुंबईत दिसून येत आहेत.

दोघेही कॅमेऱ्यात दिसल्यानंतर लोकांनी अंदाज बांधायला सुरुवात केली. दोघेही एका रेस्टॉरंटच्या बाहेर दिसले. जिथे दोघेही मस्त लूकमध्ये एकत्र दिसत आहेत. काल सायंकाळी दोघेही पांढऱ्या शर्टमध्ये दिसले होते. हा फोटो पाहिल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनीही हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत का ? असा प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. मात्र, याबाबत काही देखील उत्तर मिळाले नव्हते.

नागराजचा Ghar Banduk Biryani सिनेमा ‘या’ तारखेला होतोय रिलीज

जानेवारी महिन्यापासून परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांना ‘इंडिया यूके आउटस्टँडिंग अचिव्हर ऑनर्स’ या सन्मानाने सन्मानित करण्यात आले. भारतात पहिल्यांदाच एखाद्याला हा सन्मान मिळाला. नॅशनल इंडियन स्टुडंट्स अँड अॅल्युमनी युनियन (NISAU) यांनी ब्रिटीश कौन्सिल इन इंडिया आणि यूकेच्या आंतरराष्ट्रीय व्यापार विभाग (DIT) यांच्या संयुक्त विद्यमाने हा सन्मान आयोजित केला होता. ब्रिटीश विद्यापीठात शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून हा सोहळा पार पडला. विशेष म्हणजे भारतीय विद्यार्थ्यांचे यश लक्षात घेऊन हा उत्सव साजरा करण्यात आला.

दोघेही अविवाहित

15 वर्षांपूर्वी परिणीती चोप्रा यूकेच्या मँचेस्टर स्कूलची विद्यार्थिनी होती. राघव चढ्ढा यांच्या शिक्षणाविषयी बोलताना, त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतले. परिणीती आणि राघव दोघेही अभ्यासात हुशार होते आणि त्यांच्या वर्गात टॉपरही होते. असे देखील होऊ शकते की दोघांचे चांगले मैत्री असू शकते. रिलेशनशिप स्टेटसबद्दल बोलायचे झाले तर परिणीती सिंगल आहे आणि राघवनेही वयाच्या ३४ व्या वर्षापर्यंत लग्न केलेले नाही.

Tags

follow us