अभिनयासह गायनामध्येही अबरार काझीची एन्ट्री! शो ‘कभी नीम नीम कभी शहद शहद’ साठी गायलं रॅप

अभिनयासह गायनामध्येही अबरार काझीची एन्ट्री! शो ‘कभी नीम नीम कभी शहद शहद’ साठी गायलं रॅप

Abrar Kazi’s entry into singing along with acting! Sung a rap for the show ‘Kabhi Neem Neem Kabhi Shahad Shahad’: स्टार प्लस ही वाहिनी नेहमी कायम आठवणीत राहणाऱ्या कथांसाठी ओळखली जाणारी वाहिनी आहे. त्यातच आता स्टार प्लस हे ‘कभी नीम नीम कभी शहद शहद’ ही नवी मालिका घेऊन आली आहे. यामध्ये अबरार काझी हा मुख्य भूमिकेत आहे. त्याने या अगोदर ये है चाहतेमध्ये त्याच्या भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. यावेळी तो एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहे.

बॉलीवूड अभिनेते जितेंद्र झाले मालामाल; तब्बल ‘इतक्या’ कोटींना विकली मालमत्ता

या भूमिकेला आणखी खास बनवण्यासाठी अबरारने मालिमध्ये रॅप सॉन्ग देखील गायलं आहे. देवी गमलधारी’ असं या रॅपचं नाव आहे. त्याच्या आवाजाने मालिकेमध्ये दमदारपणा आला आहे. ही मालिका एक स्लाइस-ऑफ-लाइफ ड्रामा आहे. त्यामध्ये दैनंदिन जीवनातील भावनांना हलक्या-फुलक्या पद्धतीने दाखवण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये काही गोड तर काही कडू गोष्ट होत आहेत. जसं या मालिकेचं नाव आहे.

इतिहास केवळ पुस्तकांतच नाही तर…, सम्राट पृथ्वीराज चौहानांच्या इतिहासावर विक्रांत मॅसीने व्यक्त केल्या भावना

त्यामुळे आता अभिनयासह गायनामध्येही अबरार काझीची एन्ट्री झाली आहे. असंच म्हणावं लागेल. दरम्यान आपल्या पहिल्या वहिल्या गाण्यावर बोलताना अबरार म्हणाला की, मी अत्यंत आनंदी आहे. मी पहिल्यांदाच अशा प्रकारे एका मोठ्या मंचावर गाणं गात आहे. कधी वाटलं नव्हतं मी हे रॅक करू शकेल. पण यावर आलेल्या मित्र, चाहते आणि कुटुंबाच्या आलेल्या प्रतिक्रियांमुळे भारावून गेलो आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube