विजया बाई, तुमची माया, मार्गदर्शन आणि उदारतेबद्दल… विजया मेहतांच्या निधनानंतर अभिनेते अनुपम खेर भावूक
Actor Anupam Kher यांनी ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांचे वयाच्या 92व्या वर्षी निधनावर शोक व्यक्त करणारा व्हिडीओ शेअर केला आहे.
Actor Anupam Kher gets emotional following the passing of Vijaya Mehta : मराठी रंगभूमीला आधुनिक विचारांची दिशा देणाऱ्या, प्रायोगिक नाटकाला नवे आयाम प्राप्त करून देणाऱ्या आणि अभिनय-दिग्दर्शनाच्या क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांचे वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच मराठी नाट्यविश्व, चित्रपटसृष्टी आणि कला क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यावर आता अभिनेते अनुपम खेर यांनी शोक व्यक्त करणारा व्हिडीओ शेअर केला आहे.
नेमकं काय म्हणाले अनुपम खेर?
महान दिग्दर्शिका नायिका रंगकर्मी चित्रपट दिग्दर्शक देशाच्या सांस्कृतिक राजदूत महान व्यक्तीमत्व विजया मेहताजी ज्यांना आपण विजयाबाई म्हणून ओखळलं जात होत. त्यांच्या मृत्यूबाबत कळालं. ज्या व्हिडीओंमध्ये त्यांच्याबाबत भूतकाळ वापरला जात आहे. त्याचा प्रचंड राग येत आहे.
JEE-NEET पॅटर्न बदलणार? पालकांना मिळणार मोठा आर्थिक दिलासा; जाणून घ्या नवीन नियम
कारण मी माझ्या आयुष्यातील सुरवातीचे महत्त्वाचे चित्रपटात विजया मेहता यांच्यासोबत रावसाहेब आणि पेस्टनजी या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी मी काही चित्रपटांमध्ये काम केले असल्याने अभिनयाबद्दल बरेच काही शिकलो आहे, असे मला वाटत होते. मात्र, त्यांच्यासोबत झालेल्या प्रत्येक तालमीने अभिनय ही किती अथांग कला आहे, याची नव्याने जाणीव करून दिली.
View this post on Instagram
मानवी स्वभावाचे त्यांचे आकलन, त्यांची सखोल दृष्टी आणि विलक्षण संवेदनशीलता पाहून मी पुन्हा एकदा विद्यार्थी झाल्यासारखे अनुभवले. त्यांनी कधीही आपले ज्ञान इतरांवर लादले नाही, तर ते सहजपणे आणि प्रभावीपणे समोरच्यांपर्यंत पोहोचवले. त्यांनी कधी आवाज चढवला नाही, पण प्रत्येक कलाकाराची गुणवत्ता उंचावण्याचे काम केले. त्यांची शिस्त सौजन्याने परिपूर्ण होती, त्यांचा आपुलकीचा स्वभाव नम्रतेने भरलेला होता आणि त्यांची प्रतिभा साधेपणातून झळकत होती.
मृत्यूचे सर्वात कठोर वास्तव म्हणजे एखाद्या प्रिय व्यक्तीच्या निधनाची बातमी समजताच, आपल्याला तिच्याविषयी भूतकाळात बोलावे लागते. मनाला ही वस्तुस्थिती स्वीकारण्यासाठी मात्र बराच वेळ लागतो.
विजया बाई, तुमच्या मायेबद्दल, मार्गदर्शनाबद्दल आणि उदारतेबद्दल मनःपूर्वक आभार. अभिनय म्हणजे केवळ सादरीकरण नसून जीवन समजून घेण्याची प्रक्रिया आहे, हे तुम्ही आम्हा सर्वांना शिकवले. तुमच्या स्पर्शाने घडलेले असंख्य कलाकार, दिग्दर्शक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये तुम्ही कायम जिवंत राहाल.