Shivsena : अभिनेता सुशांत शेलारला एकनाथ शिंदेंनी दिली ‘ही’ महत्त्वाची जबाबदारी
Actor Sushant Shelar Appoint as Shivsena chitrapatsena chief : शिवसेना पक्ष ताब्यात आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विविध शाखांवर नवनवीवन पदाधिकारी नेमायला सुरूवात झाली आहे. शिंदेंनी आता शिवसेना चित्रपट सेनेच्या अध्यक्षपदी शिवसेना सचिव अभिनेता सुशांत शेलार यांची नियुक्ती केली आहे.
शिवसेना मुख्य नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना चित्रपट सेनेची स्थापना करण्यात आली असून निर्माता, लेखन, अभिनय क्षेत्रातील खालील मान्यवरांची कार्यकारिणीत नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.यामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वीच मराठी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी स्वतः एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यानंतर आता शिवसेना मुख्य नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना चित्रपट सेनेमध्ये शर्मिष्ठा राऊतला सरचिटणीस पद देण्यात आलं आहे.
PBKS vs RR: करण-शाहरुखची झंझावाती खेळी, पंजाबचे राजस्थानसमोर 188 धावांचे लक्ष्य
शिवसेना चित्रपट सेनेच्या कार्यकारिणीमध्ये ज्यांचा समावेश आहे. ही यादी पुढीलप्रमाणे असणार आहे. अध्यक्ष – सुशांत शेलार, उपाध्यक्ष – अभिनेता राजेश भोसले,शेखर फडके, केतन क्षीरसागर, भरत भानूशाली, शंतनु कुलकर्णी, सरचिटणीस योगेश शिरसाठ, शर्मिष्ठा राऊत, चिटणीस – अलका परब, अमित कुलकर्णी, विजय सुर्यवंशी, वैभव विरकर, खजिनदार – शरद राणे. शिवसेनेचे प्रसार माध्यम समन्वयक दिनेश शिंदे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
अभिनेता सुशांत शेलार एक उत्कृष्ट अभिनेता आहे. अभिनयसह सुशांत राजकारणात देखील सक्रिय आहे. अनेक कलाकारांसाठी आणि पडद्यामागच्या कलाकारांसाठी सुशांत काम करतो. या अगोदर देखील शिंदेंच्या शिवसेनेमध्ये त्याने काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यानंतर आता शिंदेनी सुशांतच्या खांद्यावर महत्त्वाची जाबाबदारी दिली आहे.