अभिनेत्री पल्लवी जोशीचा अपघात, ‘द व्हॅक्सिन वॉर’ च्या सेटवर दुर्घटना

अभिनेत्री पल्लवी जोशीचा अपघात, ‘द व्हॅक्सिन वॉर’ च्या सेटवर दुर्घटना

हैदराबाद : मराठी अभिनेत्री पल्लवी जोशीचा अपघात झाला आहे. ‘द व्हॅक्सिन वॉर’ या चित्रपटाच्या सेटवर पल्लवी जोशीचा अपघात झाला. गाडीच्या चाालकाचे नियंत्रण सुटल्याने या गाडीने अभिनेत्री पल्लवी जोशीला धडक दिली. यामध्ये पल्लवी गंभीर जखमी झाली असून तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अभिनेत्री पल्लवी जोशीचे पती म्हणजेच दिग्दर्शक विविके अग्निहोत्री यांचा ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा आगामी चित्रपट आहे. द काश्मीर फाईल्स या चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक विविके अग्निहोत्री आणि निर्माते अभिषेक अग्रवाल यांचा ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट प्रक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग हैदराबादमध्ये सुरू आहे.

दिग्दर्शक विविके अग्निहोत्री यांची पत्नी अभिनेत्री पल्लवी जोशी या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणार आहे. पल्लवी जोशी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते. पल्लवी जोशीने एक दिवसापूर्वी द व्हॅक्सीन वॉरच्या सेटवरील तिचे दोन फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये ती मनमोकळेपणाने हसताना दिसली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube