Poonam Dhillon: नवऱ्याला अद्दल घडवायला ‘या’ अभिनेत्रीने ठेवले विवाहबाह्य संबंध, अन् मग…

Poonam Dhillon: नवऱ्याला अद्दल घडवायला ‘या’ अभिनेत्रीने ठेवले विवाहबाह्य संबंध, अन् मग…

Actress Poonam Dhillon: कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य पडद्यावर आयुष्यासारखे नाट्यमय असते. ब्रेकअप असेल किंवा विवाहबाह्य संबंध, व्यसनं किंवा अकस्मात मृत्यू असे अनेक किस्से आपण ऐकले आहेत. (Actress Poonam Dhillon) असाच एक किस्सा अभिनेत्री पूनम ढिल्लोचा (Poonam Dhillon) आहे. पूनम ढिल्लो या 61 वर्षांच्या आहेत. मात्र आज देखील त्यांच्या सौंदर्याने चाहते घायाळ होतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by PoonamDhillon (@poonam_dhillon_)


पूनम ढिल्लो हे बॉलिवूडमध्ये (Bollywood) व्हॅनिटी व्हॅन आणले होते. एकदा त्या त्यांचा मित्र जगमोहन मुद्रा यांना भेटण्यासाठी लॉस एंजिलिस याठिकाणी गेले होते. तिथे त्यांनी व्हॅनिटी व्हॅन (Vanity van) बघितली. नंतर पूनम भारतात आल्या आणि त्यांनी २५ व्हॅनिटी व्हॅन बनवून घेतले होते. आता साधारण सगळ्याच कलाकारांकडे आलिशान व्हॅनिटी व्हॅन आहेत. तसेच अभिनेत्री पूनम ढिल्लो यांनी १९७८ मध्ये ‘मिस यंग इंडिया’ चा ‘किताब देखील पटकावला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by PoonamDhillon (@poonam_dhillon_)


यानंतर यश चोप्रांनी ‘त्रिशूल’ चित्रपटात त्यांना ब्रेक दिला. या चित्रपटामुळे पूनम ढिल्लो एका रात्रीत स्टार झाल्या होत्या. १६ व्या वर्षी आपल्या पहिल्या चित्रपटात त्यांनी स्विमसूट मधील सीन देण्यात आला होता. पूनम ढिल्लो यांनी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट केले आहेत.’त्रिशूल’,’काला पत्थर’,’नुरी’ हे सर्वात जास्त गाजलेले चित्रपट आहेत. करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असलेल्या पूनम ढिल्लो मात्र प्रेमामध्ये यशस्वी झाल्या नाहीत.

ब्रेकअप नंतर लग्न, विवाहबाह्य संबंध आणि घटस्फोट असं काहीसे प्रकार त्यांच्या आयुष्य घडले आहे. दिग्दर्शक रमेश तलवार यांच्याशी पूनम यांचे नाव जोडले गेले होते. ‘नुरी’ चित्रपटाच्यावेळी त्यांच्या दोघांमध्ये प्रेमप्रकरण असल्याची चर्चा रंगली होती. त्यावेळेस दोघं लिव्ह इन मध्ये राहात होते असंही सांगितले जात होते. मात्र त्यांना प्रेमामध्ये धोका मिळाला आणि हे नातं संपल्याचे समोर आले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by PoonamDhillon (@poonam_dhillon_)


१९८८ मध्ये पूनम यांनी निर्माते अशोक ठकेरिया यांच्याशी लग्न केले होते. त्यांना दोन मुले देखील झाली. मात्र १९९७ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. या घटस्फोटाला कारण ठरलं ते म्हणजे अशोक ठकेरिया यांचे विवाहबाह्य संबंध. नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध आहेत, हे समजताच पूनम यांनी पतीला धडा शिकवायचं ठरवले. यादरम्यान त्यांनी देखील विवाहबाह्य संबंध ठेवले आहेत.

Madhuri Dixit: माधुरी, मुंबई अन् वडापाव; Appleचे सीईओ टीम कुकनेही मारला प्लेटवर ताव

मात्र तरी त्यांचे लग्न काही टिकले नसळायचे समोर आले. शेवटी त्यांनी लग्नानंतर ९ वर्षांनी त्यांचा घटस्फोट घेतला. त्यांची दोन्ही मुले पूनम यांच्याबरोबर राहू लागली. २००४ मध्ये पूनम यांनी राजकारणामध्ये एन्ट्री केली. त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता. 2018 मध्ये मुंबई भाजपाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती देखील करण्यात आली होती. आज देखील त्या लहान- मोठ्या सिनेमात भूमिका साकारत असल्याचे दिसून येत असतात.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube