Download App

Ahmednagar : अहमदनगरच्या बाल कलाकाराचे हिंदीत पदार्पण; ‘या’ वेब सिरीजमध्ये दिसणार निहार गीते

  • Written By: Last Updated:

Ahmednagar : वयाच्या अवघ्या पाच वर्षापासून मराठी मालिका ‘कालाय तस्मय नमः’ ते झी टीव्ही वरील ‘इंडियास बेस्ट ड्रामेबाज’ अशा हिंदी आणि मराठी टिव्ही शोज आणि मालिका मधुन आपल्या अभिनयातून सर्वांचे मने जिंकणारा अहमदनगर जिल्ह्यातील सर्वांचा लाडका बालकलाकार निहार हेमंत गीते हा ॲमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या हिंदी वेब सिरीजच्या दुनियेतून एक नवीन भूमिका साकारत पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Manoj Jarange : ..तर एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही; जरांगेंचा खणखणीत इशारा

निहारने आता पर्यंत छोट्या पडद्यावर विविध टीव्ही शोज मध्ये ऐकरींग केले आहे. विविध जाहिराती केल्या आहेत. मोठ्या पडद्यावर देखील हिंदी चित्रपट आणि मराठी चित्रपटात देखील त्याने आपल्या उत्कृष्ट अभिनयाद्वारे सर्वांची मने जिंकली आहेत. अगदी बालपणीच मिथुन चक्रवर्ती, सलमान खान, रणबीर कपूर, रितेश देशमुख, श्रद्धा कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा अशा विविध नामांकित कलाकारां सोबत काम केले आहे.

बॉलिवूडचा शहेनशहा ज्येष्ठ अभिनेते महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील निहारचे कौतुक केले आहे. तसेच मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी देखील शिर्डी येथील एका भव्य सत्कार समारंभामध्ये निहारच्या सत्कार करत अभिनयाचे भर भरून कौतुक केले आहे.

Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरचा पहिलं वहिलं गाणं ‘गणराज गजानन’ भाविकांच्या भेटीला

येत्या 14 सप्टेंबर रोजी ॲमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या ‘एक्सल इंटरटेनमेंट’ द्वारे निर्मित हिंदी वेब सिरीज ‘बंबई मेरी जान’मध्ये एका नव्या भूमिकेत निहार दिसणार आहे. या वेब सिरीजचे दिग्दर्शन ‘रॉक ऑन टू’ या प्रसिद्ध हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शक सुजात सौदागर यांनी केले आहे. स्वतः फरहान अख्तर व रितेश सिधवानी हे या वेब सिरीजचे मुख्य निर्माते आहेत.

जरांगेंकडून सरकारला एक महिना; उपोषण सोडण्यासाठी सीएम, डीसीएम, दोन्ही राजेंनी यावे

तसेच के के मेनन, निवेदिता भट्टाचार्य, अविनाश तिवारी, अमायरा दस्तूर, जीतीन गुलाटी यांच्या प्रमुख भूमिका या वेब सिरीजमध्ये आहेत. 90 च्या दशकातील मुंबई येथील अंडरवर्ल्डच्या काही घटनांवर आधारित या हिंदी वेब सिरीजचे शूटिंग मुंबई येथील मढआयलँड, दिल्ली , गोवा तसेच भारताच्या विविध भागात मागील चार वर्षे शूटिंग करण्यात आले आहे. कोरोनाच्या कालावधीमध्ये बऱ्याच वेळेस शूटिंग बंद ठेवावे लागले.

निहारने शेअर केले अनुभव…

प्रथमच एवढ्या मोठ्या वेब सिरीजमधील आपण साकारलेल्या भूमिकेबद्दल निहारने आमच्या सोबत शूटिंग दरम्यानचे काही अनुभव शेअर केले की वेब सिरीज चे शूटिंग हे अगदी मोठ्या बॉलीवूड च्या चित्रपटांसारखेच केले जाते प्रत्येक कलाकार सकारात असलेल्या आपल्या भूमिकेला महत्त्व दिले जाते प्रत्येकाची भूमिका ही महत्त्वाची समजून वेब सिरीजची कथा ही एक केंद्रीत केली जाते. यंग सादीकची भूमिका साकारताना ऊर्दू संभाषनाचा सराव करावा लागला तसेच सेटवर पब्लिक प्लेसमध्ये गर्दीच्या ठिकाणी काम करणे खरोखर मजेशीर आणि चॅलेंजिग असते. 90 च्या दशकातील घरे, गाड्या, रस्ते हुबेहूब साकारलेला सेट पाहून खरोखर खूपच आश्चर्य वाटले आणि या निमित्ताने 90 च्या दशकातील जीवन जगण्याचा अनुभव मिळाला असे निहारणे सांगितले. निहारच्या या पहिल्याच वेब सिरीजसाठी त्याला सर्वच क्षेत्रातून निहारला शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Tags

follow us