रिलीज आधीच ‘मैदान’ आणि BMCM ची ॲडव्हान्स बुकिंग, तब्बल ‘एवढ्या’ कोटींची तिकिट्स विक्री

रिलीज आधीच ‘मैदान’ आणि BMCM ची ॲडव्हान्स बुकिंग, तब्बल ‘एवढ्या’ कोटींची तिकिट्स विक्री

Maidaan Vs BMCM Advance Booking: ईदच्या निमित्ताने चित्रपटगृहांमध्ये धमाका होणार आहे. खरंतर, 10 एप्रिल रोजी अजय देवगण (Ajay Devgan) स्टारर स्पोर्ट्स ड्रामा ‘मैदान’ (Maidaan Movie) अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफचा (Tiger Shroff) ॲक्शन पॅक्ड चित्रपट ‘बडे मियाँ छोटे मियाँ’सोबत (Bade Miyan Chhote Miyan) रिलीज होत आहे. बड्या स्टारकास्ट असलेल्या या दोन चित्रपटांचा ट्रेलर आल्यापासून प्रेक्षकांमध्ये उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. आता या चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना निर्मात्यांनी त्यांचे ॲडव्हान्स बुकिंगही सुरू केले आहे. ॲडव्हान्स बुकिंगमध्ये ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि ‘मैदान’ पैकी कोणाचे वजन जास्त असणार आहे, चला तर मग जाणून घेऊया?

‘बडे मियाँ छोटे मियाँ’चा ॲडव्हान्स बुकिंग अहवाल?

‘बडे मियाँ छोटे मियाँ’चा अप्रतिम ट्रेलर आणि गाणी रिलीज झाल्यापासूनच चाहते अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या या चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटात मनाला भिडणारी ॲक्शन आहे. या चित्रपटाबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. या सगळ्यात ‘बडे मियाँ छोटे मियाँ’चे ॲडव्हान्स बुकिंगही सुरू झाले आहे.

SACNILC च्या अहवालानुसार, पहिल्या दिवसाच्या ॲडव्हान्स बुकिंगमध्ये आतापर्यंत चित्रपटाची केवळ 173 तिकिटेच विकली गेली आहेत. त्यानंतर ‘बडे मियाँ छोटे मिया’ने आतापर्यंत 97 हजार रुपये ॲडव्हान्स बुकिंगमध्ये कमावले आहेत.

10 एप्रिल रोजी ‘मैदान’ आणि ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ची टक्कर होणार आहे. ‘मैदान’ हा सय्यद अब्दुल रहीम यांचा बायोपिक आहे. सय्यद हे 1950 ते 1963 पर्यंत भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापक होते. अजय देवगणच्या मागील ‘शैतान’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच खळबळ उडवून दिली होती. आता अभिनेता ‘मैदान’ या चित्रपटातून पुन्हा एकदा धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे.

MyLek Trailer: माय- लेकची केमिस्ट्री उलगडणार..,’मायलेक’चा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

सकनिल्कच्या अहवालानुसार स्पोर्टस् ड्रामाच्या पहिल्या दिवशी देशभरात ॲडव्हान्स बुकिंगसाठी 3961 तिकिटे विकली गेली आहेत. यासह ‘मैदान’ने आतापर्यंत 7.37 लाख रुपयांचे आगाऊ बुकिंग जमा केले आहे. ॲडव्हान्स बुकिंगमध्ये ‘मैदान’ ‘बडे मियाँ छोटे मियाँ’च्या पुढे आहे. सध्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि ‘मैदान’चे ॲडव्हान्स बुकिंग कलेक्शन पाहता अजय देवगणचे सिनेमे नंबर्सच्या गेममध्ये आघाडीवर आहेत. सध्या हे चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत ॲडव्हान्स बुकिंग कशी करतात हे पाहायचे आहे.

‘बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि ‘मैदान’ची स्टारकास्ट

‘मैदान’ हा स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे. हा चित्रपट भारतात फुटबॉलमध्ये क्रांती घडवणारे प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांच्या जीवनावर आधारित आहे. अजय देवगण, प्रियामणी, गजराज राव आणि रुद्रनील घोष यांनी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तर, अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा ॲक्शन थ्रिलर आहे. यामध्ये अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्याशिवाय पृथ्वीराज सुकुमारन, सोनाक्षी सिन्हा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube