Box Office Collection : साऊथचा पुन्हा बॉलिवूडवर दबदबा, नानीच्या ‘Dasara’ पुढे अजयचा ‘Bholaa’ पडला मागे

Box Office Collection : साऊथचा पुन्हा बॉलिवूडवर दबदबा, नानीच्या ‘Dasara’ पुढे अजयचा ‘Bholaa’ पडला मागे

Bholaa Dasara Box Office Collection : मागील काही दिवसांत अनेक दाक्षिणात्य सिनेमे चाहत्यांच्या भेटीला आले. या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. बॉलिवूडपेक्षा दाक्षिणात्य सिनेमा बघायला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. (Bholaa vs Dasara) हिंदी सिनेसृष्टीत लोकप्रिय अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) ‘भोला’ (Bholaa) हा सिनेमा ३० मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित झाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)


दुसरीकडे दाक्षिणात्य सुपरस्टार नानीचा ‘दसरा’ (Dasara) हा सिनेमा देखील प्रदर्शित झाला. अजय देवगन गेल्या काही दिवसांपासून ‘भोला’ या सिनेमाचं प्रमोशन करत होता. शाहरुखच्या ‘पठाण’नंतर प्रदर्शित झालेला अजयचा ‘भोला’ हा पहिलाच बिग बजेट सिनेमा ठरला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने छप्पर फाडके कमाई केली. यामुळे’भोला’देखील बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका करणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. पण रिलीजच्या दुसऱ्याच दिवशी हा सिनेमा कमाईच्या बाबतीत खूपच पाठीमागे पडला.

‘भोला’ या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 11.20 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने फक्त 7.80 कोटींची कमाई केली. यामुळे रिलीजच्या २ दिवसांत या सिनेमाने फक्त 18.60 कोटींची कमाई केली. दुसरीकडे दाक्षिणात्य सुपरस्टार नानीचा ‘दसरा’ हा सिनेमा रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच रेकॉर्ड ब्रेक कमाई करत आहे.

रिलीजच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाने 23.2 कोटींची कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी 9.75 कोटींची कमाई केली आहे. खरं तर आतापर्यंत ‘दसरा’ या सिनेमाने 32.95 कोटींची कमाई केली आहे. यामुळे नानीच्या ‘दसरा’ने अजयच्या ‘भोला’ला सहज मागे टाकले आहे.

Nita Ambani Dance Video : उद्घाटन NMACCचं, चर्चा मात्र नीता अंबानींची ‘या’ भजनावर केलं नृत्य, पहा व्हिडिओ

2022 हे वर्ष दाक्षिणात्य सिनेसृष्टीसाठी खास

दाक्षिणात्य सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर मोठा धुमाकूळ घातला. दाक्षिणात्य सिनेमांसमोर बॉलिवूडचे बिग बजेट सिनेमेदेखील मागे पडले आहेत. ‘पुष्पा द राइज’, ‘आरआरआर’ आणि ‘केजीएफ 2’ अशा अनेक दाक्षिणात्य सिनेमे रिलीज झाले आहेत. तर लवकरच या सिनेमांचा सीक्वेल चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ‘केजीएफ 3’, ‘पुष्पा 2’, ‘बाहुबली 3’ हे दाक्षिणात्य सिनेमे लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत.

दाक्षिणात्य सिनेमांमध्ये असलेला अॅक्शनचा तडका, रहस्य, थरार, नाट्य रसिकांच्या पसंतीस उतरत आहे. यामुळे पैसा वसूल सिनेमा बघायला असेल तर ते दाक्षिणात्य सिनेमे बघायला पसंती दर्शवत आहेत. बॉलिवूड किंवा मराठी सिनेमा पाहण्यापेक्षा दाक्षिणात्य सिनेमा बघायला प्रेक्षक जास्तीत- जास्त पसंती देत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube