Nita Ambani Dance Video : उद्घाटन NMACCचं, चर्चा मात्र नीता अंबानींची ‘या’ भजनावर केलं नृत्य, पहा व्हिडिओ
Nita Ambani Dance Video : भारतीय कला आणि संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी उभारण्यात आलेले अत्याधुनिक असे (NMACC Grand Opening) ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्राचे’ (NMACC)उद्घाटन करण्यात आले आहे. (Nita Ambani Dance Video) यावेळी दिमाखदार उद्घाटन सोहळय़ाला जगभरातील नामवंत कलाकारांसह अनेक उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली.
View this post on Instagram
या समारोहात नीता अंबानी (Nita Ambani) यांनी रघुपती राघव राजाराम या गीतावर नृत्य केले. नीता अंबानी यांचा भरतनाट्यचा व्हिडीओ (Nita Ambani Dance Video) सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एनएमएसीसीने देखील सोशल मीडियावर नीता अंबानी यांचा नृत्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.
#WATCH | Mumbai: Nita Ambani gracefully dances on 'Raghupati Raghava Raja Ram' at Nita Mukesh Ambani Cultural Centre (NMACC) pic.twitter.com/ndCKYdvvj1
— ANI (@ANI) April 1, 2023
उद्धाटन सोहळ्याच्या दरम्यान नीता अंबानी यांनी ‘रघुपती राघव राजा राम’ या भजनावर नृत्य सादर केलं आहे. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’च्या सोहळ्याच्या दरम्यान नीता अंबानी यांनी आपल्या नृत्याने उपस्थित असलेल्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
नृत्य सादर करताना नीता अंबानी यांनी खास लूक केला होता. लाल रंगाचा लेहेंगा आणि त्यावर आकर्षक दागिने असा नीता अंबानी यांचा जबरदस्त लुक होता. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’ हे मुंबईतील वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ सेंटरमध्ये बनवण्यात आलं आहे.
Kiara Advani Private Photo : कियारा अडवाणीने शेअर केला बेडरूममधील फोटो; नेटकऱ्यांना दिसलं असं काही की..
हे देशातलं सर्वात मोठं कलाकेंद्र असल्याचं म्हटलं जात आहे. या कल्चरल सेंटरच्या माध्यमातून भारतीय संस्कृती जोपासली जाणार आहे. देशातील वेगवेगळ्या कलेचे प्रकार या मंचावर सादर होणार आहेत. यात नृत्य, अभिनय, संगीत, साहित्य अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे.