‘अहान हा आपण लहानपणापासून पाहत आलो आहोत अशा रोमँटिक हिरोंसारखा आहे!’: अली अब्बास जफर

अली यांचे मत आहे की अहानमध्ये त्याच्या पिढीतील इतर कोणत्याही अभिनेत्यात न दिसणारा ओल्ड-स्कूल रोमँटिक हिरोचा मोहकपणा आहे.

  • Written By: Published:
Untitled Design (23)

Ali Abbas Zafar praises Ahan Pandey : ‘सुलतान’ आणि ‘टायगर झिंदा है’सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे दिग्दर्शक अली अब्बास जफर आता ‘सैयारा’चा स्टार अहान पांडे याला आपल्या आगामी अनटाइटल्ड चित्रपटात दिग्दर्शित करत आहेत. हा चित्रपट यशराज फिल्म्स च्या बॅनरखाली तयार होत आहे. अली यांचे मत आहे की अहानमध्ये त्याच्या पिढीतील इतर कोणत्याही अभिनेत्यात न दिसणारा ओल्ड-स्कूल रोमँटिक हिरोचा मोहकपणा आहे.

ते म्हणतात, “अहानबद्दल मला सर्वात जास्त आवडते ते म्हणजे त्याची प्रामाणिकता. आजच्या काळात, जिथे बऱ्याच गोष्टी बनावटी आणि अभिनयासारख्या वाटतात, तिथे अहान आपल्या अभिनयात एक जुनी, खरीखुरी प्रामाणिक भावना घेऊन येतो, अगदी त्या रोमँटिक हिरोंसारखा, ज्यांना पाहत आपण मोठे झालो आहोत. कॅमेरा हे टिपतो. पडद्यावर बनावटी असुरक्षितता दाखवता येत नाही; ती परिणामकारक ठरत नाही. अहान असुरक्षित होण्यास घाबरत नाही, आणि हीच गोष्ट त्याला वेगळे बनवते.”

अली पुढे म्हणतात, “प्रेक्षक अहानशी जोडले गेले आहेत कारण तो त्यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करत नाही. तो फक्त त्या क्षणात उपस्थित असतो. त्याच्यात एक कोमलता आहे, पण त्याचवेळी ताकदही आहे. हाच समतोल प्रेक्षकांना त्याच्या बाजूने उभे राहायला भाग पाडतो, विशेषतः प्रेमकथांमध्ये. मला मनापासून वाटते की तो अशा दुर्मिळ रोमँटिक हिरोंपैकी एक होऊ शकतो, जे चित्रपट संपल्यानंतरही प्रेक्षकांना काहीतरी जाणवून देतात.”

मद्य घोटाळाप्रकरणी अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा ; निर्दोष मुक्तता

अहान 30 मार्चपासून मुंबईत अली अब्बास जफर यांच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार असून, त्यानंतर सुमारे 60 दिवसांच्या शूटसाठी यूकेला रवाना होणार आहे. हा एक अ‍ॅक्शन एंटरटेनर चित्रपट असून, यात त्याच्यासोबत दमदार युवा अभिनेत्री शर्वरी झळकणार आहे. अली यांची इच्छा आहे की प्रेक्षकांनी अहानचा रोमँटिक हिरोचा अवतार अ‍ॅक्शनच्या तीव्रतेसोबत पाहावा, जो त्यांच्या मते भावनिकदृष्ट्या अत्यंत प्रभावी ठरेल. अलींच्या मते, अहानमधील खरी भावना त्याला या जॉनरसाठी परिपूर्ण बनवते.

अली म्हणतो, “खरा रोमँटिक हिरो फक्त कोमलतेने ओळखला जात नाही, त्याची ओळख भावनिक तीव्रतेने होते, आणि ही तीव्रता अ‍ॅक्शनमध्ये अतिशय सुंदरपणे उमटते. रोमांस हिरोला सौम्यता देतो. अ‍ॅक्शन त्याला ज्वाला देते. जेव्हा सौम्यता आणि ज्वाला एकत्र येतात, तेव्हा प्रेक्षकांसाठी हा एक अत्यंत प्रभावी अनुभव ठरतो, ज्यामध्ये अहानचा एक पूर्णपणे नवा पैलू दिसतो, जो त्यांनी यापूर्वी पाहिलेला नाही. अहानच्या डोळ्यांत असुरक्षितता आहे, आणि हिच गोष्ट अ‍ॅक्शन-रोमँसला ताकद देते.”

तो पुढे म्हणतो, “प्रेक्षकांना फक्त पडद्यावर घावाघाव पाहायचे नसतात; प्रत्येक वारामागचा हेतू आणि भावना त्यांना जाणवायला हव्या असतात. जर हिरो तो ज्या गोष्टीवर विश्वास ठेवतो, ज्या गोष्टीवर प्रेम करतो आणि ज्या गोष्टीचे संरक्षण करू इच्छितो त्यासाठी लढत असेल, तर अ‍ॅक्शनचे भावनिक महत्त्व अनेक पटींनी वाढते. प्रेक्षक त्याच्याशी अधिक खोल पातळीवर जोडले जातात.”

follow us