नाट्य परिषदेच्या निवडणुकीत प्रशांत दामलेंच्या रंगकर्मी पॅनेलने मारली बाजी, 8 जागांवर विजय
All India Marathi Theater Council Election 2023 : कोणत्याही राजकीय निवडणुकीत जितकी चुरस असते तितकीच चुसर यंदाच्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या (All India Marathi Theater Council) पंचवार्षिक निवडुकीत निर्माण झाली होती. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत प्रशांत दामले (Prashant Damle) यांच्या रंगकर्मी नाटक समूह पॅनलने बाजी मारली. तर प्रसाद कांबळी (Prasad Kambli) यांच्या आपलं पॅननला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. रंगकर्मी पॅननला 8 तर आपलं पॅननला फक्त 2 जागा मिळाल्या.
एखाद्या राजकीय निवडणुकी एवढं महत्व प्राप्त झालेली अ. भा. ना. परिषदेची निवडणूक 16 तारखेला पार पडली होती. या निवडणुकीत यंदा प्रशांत दामले आणि प्रसाद कांबळी यांच्यात थेट लढत होती. त्यामुळं सर्वांच लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडं लागलं होतं. मुंबई, ठाणे,सांगली, धुळे, सोलापूर, नगर, बीड, वाशीम आणि नागपूर या शाखांमध्ये मतदान पार पडले. तर पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, उस्मानाबाद, रायगड, रत्नागिरी, अमरावती व बेळगाव या ठिकाणी ही निवडणूक बिनविरोध झाली.
शेतजमिनीची अदलाबदल करायची आहे … मग ही बातमी नक्की वाचा
मुंबई मध्यवर्ती शाखेमध्ये दामले आणि कांबळी यांच्या रंगकर्मी आणि आपलं पॅनल हे दोन पॅनल निवडणूकीच्या रिंगणात होते. या दोन पॅनलमध्ये ही निवडणुकअटीतटीची होईल, असा अनेकांचा अंदाज होता. मात्र, निवडणुकीचे निकाल पाहता, ही निवडणुक एकतर्फीच झाली,असं म्हणावं लागेल.
मुंबई मध्यवर्ती शाखेतील 10 जागांवर रंगकर्मी नाटक समूह पॅनलचे 8 उमेदवार विजयी झाले. तर आपलं पॅनलच्या फक्त 2 उमेदार या निवडणुकीत विजयी झाले. रंगकर्मी पॅनलचे प्रशांद दामले, विजय केंकरे, विजय गोखले, सयाजी शिंदे, सुशांत शेलार, अजित भुरे, सविता मालपेकर, आणि वैजयंती आपटे विजयी झाले. रंगकर्मी नाटक समूहाने एकून 52 जागांवर विजय प्राप्त केला आहे. तर आपलं पॅनलमधून प्रसाद कांबळी आणि सुकन्या कुलकर्णी-मोने या दोघांचा विजय झाला आहे.
मुंबई मध्यवर्ती शाखेचा निकाल –
1 प्रशांत दामले – 759 votes – रंगकर्मी पॅनल
2 सुशांत शेलार – 623 votes – रंगकर्मी पॅनल
3 अजित भुरे – 621 votes – रंगकर्मी पॅनल
4 विजय केंकरे – 705 Votes – रंगकर्मी पॅनल
5 विजय गोखले – 663 Votes – रंगकर्मी पॅनल
6 सवीता मालपेकर – 519 Votes – रंगकर्मी पॅनल
7 सयाजी शिंदे – 634 votes – रंगकर्मी पॅनल
8 वैजंयती आपटे – 590 votes – रंगकर्मी पॅनल
9 प्रसाद कांबळी – 565 votes – आपलं पॅनल
10 सुखन्या मोने – 567 votes – आपलं पॅनल
दरम्यान, मतदारांनी आमच्यावर दाखवलेल्या या विश्वासाला आम्ही नक्कीच पात्र ठरू. आणि नाट्य परिषदेला शिखरावर नेवू, असा विश्वास रंगकर्मी नाटक समूहाच्या या पॅनलच्या विजयी उमदेवारांनी व्यक्त केला. निवडणुकीचा निकाल पाहता, त्यामुळं प्रशांत दामले हेच अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवडले जातील.