Alyad Palyad: ‘अल्याड पल्याड’ चित्रपटात सिद्धयोगी मकरंद देशपांडे अनोख्या भूमिकेत

Alyad Palyad: ‘अल्याड पल्याड’ चित्रपटात सिद्धयोगी मकरंद देशपांडे अनोख्या भूमिकेत

Makarand Deshpande New Look from Alyad Palyad : मोजक्याच तरीही लक्षवेधी भूमिका करत रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावर अभिनेता मकरंद देशपांडे (Makarand Deshpande) यांनी आपल्या अभिनयाचा जबरदस्त ठसा उमटवला आहे. या अवलिया कलाकाराने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य ( New Look ) गाजवले आहे. (Alyad Palyad Movie) त्यामुळे त्यांच्या अनोख्या भूमिकेबद्दल प्रेक्षकांना कायमच मोठी उत्सुकता लागून राहिलेली असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pritam SK Patil (@pritamsk.patil)


‘अल्याड पल्याड’ या पुढील मराठी सिनेमाच्या (Marathi Movie) निमित्ताने ते तंत्र-मंत्र यात पारंगत असलेल्या एका सिद्धयोगी साधूची मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. एस.एम.पी प्रोडक्शन् अंतर्गत ‘अल्याड पल्याड’ चित्रपट 14जूनला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची निर्मिती शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांनी केली असून दिग्दर्शन प्रीतम एस के पाटील यांचे आहे.

आपला महाराष्ट्र हा आधीच विविधतेने नटलेला आहे. त्यात अनेक जुन्या संस्कृती, तसेच प्रथा, परंपरा आहेत. अशाच एका अनोख्या परंपरेची आराधना करण्याची प्रथा असणाऱ्या दुर्गम भागातल्या एका गावाची, तिथल्या माणसांची रहस्यमय कथा असलेला ‘अल्याड पल्याड’ हा थरारपट आहे. आव्हानात्मक भूमिका करायला मला नेहमीच आवडतात. ‘अल्याड पल्याड’ मधली भूमिका एका मांत्रिकाची आहे, त्याला पूर्ण सिद्धी प्राप्त नाही. त्यातून तो त्या गावाला कसा वाचवणार? याची अतिशय थरार गोष्ट यात मांडली आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच खिळवून ठेवणार आहे, यात काही शंका नाही असं मकरंद देशपांडेने सांगितलं आहे.

Crew Box Office: बॉलीवूडच्या ‘क्रू’ची जादू, क्रिती, तब्बू अन् करिनाच्या चित्रपटाची बंपर कमाई

गौरव मोरे, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, भाग्यम जैन, अनुष्का पिंपुटकर आदि कलाकारांच्या भूमिका ‘अल्याड पल्याड’ सिनेमात आहेत. कथा प्रीतम एस के पाटील यांची असून पटकथा संवाद संजय नवगिरे यांचे आहेत. छायांकन योगेश कोळी यांचे तर संकलन सौमित्र धरसुलकर यांचे आहे. वेशभूषा अपेक्षा गांधी तर ध्वनी स्वरूप जोशी यांचे आहे. लाईन प्रोड्यूसर दिपक कुदळे पाटील आहेत. एस.एम.पी प्रोडक्शन् अंतर्गत ‘अल्याड पल्याड’ सिनेमा 14 जूनला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची निर्मिती शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांनी केली असून दिग्दर्शन प्रीतम एस के पाटील यांचे आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube