अॅमेझॉन MGM स्टुडिओ इंडिया आणि झी म्युझिक प्रस्तुत ‘निशानची’ चा म्युझिकअल्बम प्रदर्शित

Amazon MGM Studios : ‘निशानची’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा संगीत अल्बम अॅमेझॉन MGM स्टुडिओ इंडिया (Amazon MGM Studios) आणि झी म्युझिक (Zee Music) कंपनीने आज अधिकृतरीत्या लॉन्च केला आहे. या अल्बममध्ये एकूण 15 ओरिजिनल गाणी समाविष्ट असून, यामध्ये प्रेम, बंडखोरी, भावना आणि जोश यांचा सुरेल संगम आहे. हे अल्बम चित्रपटाच्या बिनधास्त आणि बेधडक स्वभावाचे संगीतमय प्रतिबिंब आहे.
या विविधतेने भरलेल्या अल्बममध्ये सुप्रसिद्ध आणि उभरत्या संगीतकारांचा अनोखा संगम आहे. यामध्ये अनुराग सैकिया, मनन भारद्वाज, ध्रुव घाणेकर, ऐश्वर्य ठाकरे आणि निशिकर छिब्बर यांचे संगीत आहे. तर गीतलेखनासाठी शश्वत द्विवेदी, मनन भारद्वाज, डॉ. सागर, ऐश्वर्य ठाकरे, प्यारे लाल यादव, वरुण ग्रोवर आणि रेणू छिब्बर यांनी आपले शब्द दिले आहेत.
या अल्बममध्ये आपली गायकी सादर करणाऱ्या गायकांमध्ये अरिजीत सिंह, मधुबंती बागची, मनन भारद्वाज, प्राजक्ता शुकरे, हिमानी कपूर, भूपेश सिंह, राहुल यादव, विजय लाल यादव, ऐश्वर्य ठाकरे, उपेंद्र यादव, श्रेया सुंदररमन, सुकन्या दास, देवेंद्र कुमार, वंदना सिन्हा, कल्पना पटोवारी, अलाया घाणेकर आणि अमाला घाणेकर यांचा समावेश आहे. प्रत्येक गायकाने त्यांच्या खास शैलीत हे गाणी जिवंत केली आहेत.
‘निशानची’चा संगीत अल्बम फक्त एक साउंडट्रॅक नसून, हा चित्रपटाचा आत्मा आहे.‘सरम लागेला’ सारख्या जोशपूर्ण गाण्यांपासून ते अरिजीत सिंहने गायलेल्या हृदयस्पर्शी ‘बिरवा’पर्यंत, ‘पिजन कबूतर’मधील मातीचा गंध आणि ‘झूले झूले पालना’ सारख्या लोकसंगीतप्रधान गाण्यांपर्यंत, प्रत्येक गाणं स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतं आणि एकत्र मिळून एक प्रभावी संगीतमय कथा उभी करतं. यातील ‘नींद भी तेरी’ आणि ‘डिअर कंट्री’ ही आधीच लोकप्रिय ठरलेली गाणी या अल्बममधील खास आकर्षण आहेत. गायक अरिजीत सिंह यांनी ‘बिरवा’ या गाण्याविषयी म्हणाले, “हे गाणं मनात घर करून राहतं. हे गाणं गाणं म्हणजे त्या भावना जगण्यासारखं होतं, आणि तीच खरी भावना श्रोत्यांपर्यंत पोहोचते.”
“पोलिस स्टेशन में भूत” या रोमांचक हॉरर कॉमेडी चित्रपटासाठी राम गोपाल वर्मा – मनोज वाजपेयी एकत्र
‘निशानची’ हा चित्रपट जार पिक्चर्सच्या अजय राय आणि रंजन सिंह यांच्या बॅनरखाली फ्लिप फिल्म्सच्या सहकार्याने तयार करण्यात आला आहे. या चित्रपटातून ऐश्वर्य ठाकरे त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करत आहेत आणि ते या चित्रपटात हाय-ऑक्टेन डबल रोल मध्ये दिसणार आहेत. त्यांच्यासोबत वेदिका पिंटो मुख्य भूमिकेत असून, मोनिका पंवार, मोहम्मद ज़ीशान अय्यूब आणि कुमुद मिश्रा हेही महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. चित्रपटाची कथा प्रसून मिश्रा, रंजन चंदेल आणि अनुराग कश्यप यांनी एकत्रितपणे लिहिली आहे. अॅक्शन, विनोद आणि ड्रामा यांनी परिपूर्ण असलेला ‘निशानची’ हा मसाला एंटरटेनर 19 सप्टेंबर 2025 रोजी संपूर्ण भारतात सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.