Bad Boy : मिथुन चक्रवर्तीच्या मुलाच्या चित्रपटाला अमिताभ बच्चन यांच्या शुभेच्छा!

Bad Boy : मिथुन चक्रवर्तीच्या मुलाच्या चित्रपटाला अमिताभ बच्चन यांच्या शुभेच्छा!

Amitabh Bachhan wished to Namashi Chakraborty : अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा नमाशी चक्रवर्ती याचा बॅड बॉय हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटाला येणार आहे. नमाशी चक्रवर्ती आणि अमरिन हे दोघे या चित्रपटात मुख्य भुमिकेत आहेत. या चित्रपटातील काही गाणे देखील रिलीज झाले आहेत.

अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा नमाशी चक्रवर्ती याच्या या चित्रपटाला अभिनेते अमिताभ बच्चन यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्यांनी या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी लिहिले की, ‘All the best wishes as always.. Bad Boy releasing on April 28th’ यामध्ये अमिताभ यांनी चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे.

या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर या चित्रपटाचं दिग्दर्शन ज्येष्ठ दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांनी केलं आहे. चित्रपटाचं प्रोडक्शन अंजुम कुरेशी आणि साजित कुरेशा यांनी इनबॉक्स पिक्चर्स या बॅनरखाली केले आहे.

Rekha: रेखा यांच्या सेक्ससंबंधी वक्तव्याने खळबळ; म्हणाली, “लग्नाआधी शरीरसंबंध…”

या चित्रपटातील कलाकारांची नावं सांगायची झाली तर नमाशी चक्रवर्ती आणि अमरिन हे दोघे या चित्रपटात मुख्य भुमिकेत आहेत. जॉनी लिव्हर, राजपाल यादव, दर्शन जरीवाला, शाश्वत चॅटर्जी यांचा सहभाग आहे. 28 एप्रिलला हा चित्रपट रिलीज होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube