“पापा, हुन तेरी कुडी एक्टर बन गयी” म्हणत अनीत पड्डाकडून झी सिने अवॉर्ड्स 2026 वडिलांना अर्पण केला
Aneet Padda ने झी सिने अवॉर्ड्स 2026 मध्ये बेस्ट डेब्यू फिमेल तसेच व्ह्यूअर्स चॉईस बेस्ट एक्ट्रेस हे दोन्ही पुरस्कार पटकावले.
Aneet Padda dedicates Zee Cine Awards 2026 to his father : बॉलिवूडमधील उदयोन्मुख अभिनेत्री अनीत पड्डाने प्रतिष्ठित झी सिने अवॉर्ड्स 2026 मध्ये उल्लेखनीय दुहेरी यश मिळवत बेस्ट डेब्यू फिमेल तसेच व्ह्यूअर्स चॉईस बेस्ट एक्ट्रेस हे दोन्ही पुरस्कार पटकावले. भारतीय सिनेमातील उत्कृष्टतेचा गौरव करणारे हे पुरस्कार मुंबईत झालेल्या भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात आले.
View this post on Instagram
अनीतच्या या विजयाने केवळ तिच्या अभिनय कौशल्याचीच दखल घेतली नाही, तर देशभरातील प्रेक्षकांशी तिने निर्माण केलेल्या दृढ नात्याचाही प्रत्यय दिला. या सन्मानांमुळे अनीत पड्डा ही बॉलिवूडमधील सर्वात आशादायी नव्या कलाकारांपैकी एक म्हणून ठामपणे समोर आली आहे.
Mardaani 3 ची 5व्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर मजबूत पकड; एकूण कमाई 51.47 कोटी
आपल्या स्वीकृती भाषणात अनीतने एक अत्यंत वैयक्तिक आणि भावनिक समर्पण व्यक्त केले, ज्याने उपस्थित सर्वांची मने जिंकली. ती म्हणाली,“सध्या माझ्या मनात एकच गोष्ट येतेय — हा सन्मान माझ्या बाबांना अर्पण करण्याची. पापा, मला माहीत आहे की तुम्हालाही लहानपणी अभिनेता बनायचं होतं. आता तुमची मुलगी अभिनेत्री बनली आहे. जेव्हा तुम्ही मला सांगितलं की तुम्ही तुमचं स्वप्न माझ्यामार्फत जगत आहात, तेव्हा मी कधीही इतकी आनंदी झाले नव्हते. आय लव्ह यू सो मच.”
जुन्या मैत्री आणि नव्या सत्तेमधील संघर्ष उलगडणार ‘एस्पिरेंट्स’ सीझन 3 चा दमदार ट्रेलर रिलीज
तिने पुढे प्रेक्षकांनाही मनापासून धन्यवाद देत सांगितले, “स्क्रीनवर तुम्ही ज्या जादूसाठी टाळ्या वाजवता, त्या टाळ्या फक्त आमच्या अभिनेत्यांसाठी नसतात. त्या प्रत्यक्षात तुमच्या सगळ्यांच्या कथा आणि तुमच्या आयुष्यांसाठी असतात. त्या सन्मानाचा छोटासा भाग होण्याची संधी मला मिळतेय, याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे.”
