Samantha Ruth Prabhu : समांथाच्या शाकुंतलममधील आणखी एक गाणं रिलीज

Samantha Ruth Prabhu : समांथाच्या शाकुंतलममधील आणखी एक गाणं रिलीज

चेन्नई : दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभु गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ती चर्चेत असण्याची कारण म्हणजे तिचा घटस्फोट, आजारपण पण आता समांथा रुथ प्रभु चर्चेत आहे. ते तिच्या आगामी चित्रपट ‘शाकुंतलममुळे’. सामंथा रुथ प्रभुचा बहुचर्चित चित्रपट ‘शाकुंतलम’ मधील आता आणखी एक गाणं रिलीज झालं आहे.

‘येलेलो येलेलो’ असं या गाण्याचं नाव आहे. हे गाणं गायक जावेद अली यांनी गायलं असून मनी शर्मा यांनी संगीत दिलं आहे. तर प्रशांत इंगोले यांनी हे गाणं लिहीलं आहे. टीप्स ऑफिशिअल या युट्यूब चॅनलवरून हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे.

या अगोदर या चित्रपटाचा ट्रेलर आणि दोन गाणे रिलीज झाले होते. या गाण्यांची नाव अनुक्रमे ‘मल्लिक मल्लिक’, ‘ऋषीमुनीयों का’ अशी होती. तर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून सोशल मिडीयावर ट्रेंड करत होता. हा ट्रेलर तेलुगूशिवाय हिंदीमध्ये देखील रिलीज करण्यात आला. 2 मिनिट 52 सेकंडच्या या शकुंतलमच्या ट्रेलरने पुन्हा एकदा सामंथा देशभर आणि जगभर पोहोचण्यासाठी सज्ज झाली आहे.

दरम्यान मायोसिटिस नावाच्या ऑटो-इम्यून आजाराने ग्रस्त असलेली अभिनेत्री समांथा रुथ प्रभुच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. सामंथा आता पुन्हा कामवर परतली आहे. समांथाने सोशल मिडीयवर यासंदर्भात पोस्ट करत माहिती दिली होती.

2023 च्या सुरुवातीला, समांथाने नव वर्षासाठी संकल्प एअर करत सकारात्मकता दाखवली होती. तर नुकतच समांथा रुथ प्रभुने प्रकृतीमुळे अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओची वेब सीरीज सिटाडेलमधून बाहेर पडणार आहे. अशा चर्चा होत्या. तर तिच्या जवळच्या व्यक्तींनी या अफवा फेटाळून लावल्या आहेत. तिच्या टीमने सांगितले की, ‘ती जानेवारीच्या मध्यात शूटिंग सुरू करेल.” शकुंतलम नंतर, सामंथा रुथ प्रभू कुशीमध्ये विजय देवरकोंडासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube