Joker: ‘जोकर’ फेम अभिनेत्याचा चित्रपट ठरला विचित्र; पाहण्याआधी घ्यावा लागणार डॉक्टरांचा सल्ला

Joker: ‘जोकर’ फेम अभिनेत्याचा चित्रपट ठरला विचित्र; पाहण्याआधी घ्यावा लागणार डॉक्टरांचा सल्ला

Joker: चित्रपटाची कथा, गाणी, दिग्दर्शन व क्लायमॅक्स या गोष्टी प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करून जाव्यात व चित्रपट उत्कृष्ट ठरावा असा प्रयत्न प्रत्येक चित्रपट निर्मात्याचा व दिग्दर्शकाचा असतो. पण याउलट 2023 या वर्षातील सर्वात विचित्र सिनेमा ठरला आहे तो अरी एस्टरचा ‘ब्यू इज अफ्रेड (Blue is Afraid)’. हा सिनेमा 2023 सालचा असा एक सिनेमा आहे ज्याची प्रचंड चर्चा होत आहे.

कारण हा सिनेमा हॉरर आहे, ना कोणत्याही रियल बेस स्टोरीवर आहे. या सिनेमाची कथा नेहमीच्या सिनेमांसारखी नसून काही वेगळी आहे. हा सिनेमा निराशाजनक वातावरणात तयार करण्यात आला असून नैराश्यात गेलेल्या लोकांवर चित्रित करण्यात आलेला आहे. हा संपूर्ण सिनेमा हा नैराश्याच्या गर्दीत लोटला गेलेला आहे. सिनेमा जरी उत्तम असला तरी डोकं चक्रावून टाकणारे दृश्य, विचित्र असे डायलॉग्स आणि ब्लॅक कॉमेडी (Black comedy) यामुळे हसीना या वर्षातील सर्वाधिक विचित्र सिनेमा ठरला आहे.

सिनेमाची कथा ही ‘ब्यू’ नावाच्या एका जगाला घाबरणाऱ्या मुलाची आहे. हा मुलगा जेव्हा त्याच्या आईला भेटायला जातो तेव्हा काही विचित्र घटना त्याच्यासोबत घडतात आणि त्यात तो पूर्णपणे अडकतो त्याचबरोबर तो एका आजाराची झुंजत असल्याचाही या सिनेमात दाखवण्यात आले. या सिनेमाबद्दल आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे हा सिनेमा पाहण्यासाठी तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचे काही लोकांचं म्हणणं आहे.

Prashant Damle: यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल नाट्यरसिक आणि कलावंतांसाठी होणार खुले

तसेच सिनेमा पाहून झाल्यावर त्याचा खोल प्रभाव प्रेक्षकांच्या मनावर होत असल्याचं सांगितलं जात आहे. या सिनेमाची स्टोरी ही तीन तासांची असून व्हाकिन फिनिक्स या कलाकाराने ‘ब्यू’ ही मुख्य भूमिका साकारली आहे. या अगोदर व्हाकिनने ‘जोकर’ या सिनेमातून आपल्या प्रशंसनीय अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली होती. जोकर या सिनेमाला अव्वल दर्जाचे पुरस्कार व मानांकन मिळालेले आहे. ‘ब्यू इज अफ्रेड’ हा सिनेमा 26 मे रोजी भारतात प्रदर्शित झाला. पण फार मर्यादित स्क्रीनवरच प्रदर्शित केला गेला. प्रेक्षक आता या सिनेमाच्या ओटीटी रिलीजची वाट बघत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube