Arjun Rampal: अवघड आहे रे बाबा! लग्नाच्या आधीच प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता पुन्हा होणार बाबा

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 29T162720.090

Arjun Rampal: अभिनेता अर्जुन रामपाल (Actor Arjun Rampal) त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या फिटनेसमुळे देखील ओळखला जात असतो. सध्या मात्र अर्जुन रामपाल एका वेगळ्या कारणासाठी जोरदार चर्चेत आला आहे. अर्जुनची गर्लफ्रेंड गॅब्रीएलाने (gabriella) इन्स्टाग्रामवर फोटो शेअर (Photo Share ) करत दुसऱ्या प्रेग्नंसीची माहिती दिली आहे. अर्जुन आणि पालक दुसऱ्यांदा आई बाबा होणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gabriella Demetriades (@gabriellademetriades)


मॉडेल गॅब्रिएला डेमेट्रिएड्सने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर (Instagram account) मॅटर्निटी फोटोशूटमधील एक फोटो शेअर करत दुसर्‍या गरोदरपणाची माहिती दिली आहे. ती अभिनेता अर्जुन रामपालला डेट करत असलायची चर्चा आहे, आणि या जोडप्याना अगोदरच ३ वर्षांचा मुलगा आहे. तिने फोटो शेअर करत असताना गॅब्रिएलाने “हे खरंच आहे की एआय आहे?” असं कॅप्शन दिले आहे.

या फोटोंमध्ये गॅब्रिएलाने फ्लोय ऑरेंज गाउन घातल्याचे दिसून येत आहे. गॅब्रिएलाने फोटो पोस्ट करत त्यावर अर्जुन रामपालने हार्ट इमोजी कमेंट केले आहेत. तसेच काजल अग्रवाल आणि इतरही कलाकार मंडळींनी देखील तिला शुभेच्छा दिल्या आहेत. अर्जुन रामपाल आणि त्याची पहिली बायको मेहेर जेसिका यांनी २१ वर्षांच्या संसारानंतर २०१९ मध्ये घटस्फोट घेतला होता.

Wrestlers Protest: कुस्तीपटूंना अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचे समर्थन, मदत करण्याची केली विनंती

तेव्हापासून अर्जुन गॅब्रिएलाला डेट करत असल्याची चर्चा आहे. त्याला पहिल्या पत्नीपासून २ मुली आहे, तर गर्लफ्रेंडपासून १ मुलगा आहे. आता तो पुन्हा एकदा बाबा होणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

Tags

follow us