दोन लग्नं… प्रेम, संघर्ष आणि संगीत! आशा भोसले यांची अनोखी लव्ह स्टोरी !

Asha Bhosle Passes Away-गानकोकिळा लता मंगेशकर यांचे सचिव गणपत राव भोसले 36 वर्षांचे होते. म्हणजे 20 वर्ष मोठ्या व्यक्तीशी त्यांनी पहिलं लग्न केलं.

  • Written By: Published:
Asha Bhosale

Asha Bhosle Passes Away : मराठी, हिंदी भाषांमध्ये अनेक अजरामर गाणे गाणाऱ्या दिग्गज गायिका (Asha Bhosle) आशा भोसले यांचं वयाच्या 93 व्या वर्षी मुंबईत निधन झालं. महाराष्ट्रातील सांगलीमध्ये 8 सप्टेंबर 1933 जन्मलेल्या भोसले या पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या तिसऱ्या कन्या होत्या. त्यांचे वडील शास्त्रीय गायक आणि अभिनेते होते. लता मंगेशकर, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर आणि मीना मंगेशकर-खाडीकर ही त्यांची भावंडं होती. त्यांनी पहिलं गाणं 1943 मध्ये एका मराठी चित्रपटात गायलं होतं. त्यांनी ते गाणं आपली बहीण लता मंगेशकर यांच्यासोबत गायलं होतं. पुढे, वयाच्या 16 व्या वर्षी, त्यांनी ‘रात की राणी’ या चित्रपटासाठी आपलं पहिलं सोलो गाणं गायलं. आशाताईंनी त्यांच्या ‘Asha Bhosle : A Life In Music या बायोग्राफीमध्ये त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींबद्दल सांगितलंय.

गानकोकिळा लता मंगेशकर यांचे सचिव गणपत राव भोसले 36 वर्षांचे होते. म्हणजे 20 वर्ष मोठ्या व्यक्तीशी त्यांनी पहिलं लग्न केलं. या लग्नाला त्यांच्या घरातून विरोध होता. त्यामुळं त्यांनी पळून जाऊन लग्न केलं. या लग्नानंतर लतादीदी त्यांच्यावर खूप नाराज होत्या. एवढंच नाही तर लतादीदी अनेक वर्षे त्यांच्याशी बोलत नव्हत्या. पण हे लग्न काही फार काळ टिकलं नाही. पती आणि सासरच्या मंडळींनी त्यांचा छळ केला. त्यांना मारहाण केली जात होती. पुढं त्यांनी 1960 मध्येच गणपतरावांना सोडलं.

दोन मुलं अन् तीन महिन्यांच्या गरदोर असताना त्यांनी सासर सोडलं अन् आईच्या घरी परतल्या. त्यांनी पुस्तकात सांगितलं की, त्या गर्भवती असताना गणपतराव त्यांना मारहाण करायचे. या मारहाणीमुळं त्यांना अनेकदा रुग्णालयात जावं लागलं.

पहिल्या लग्नाच्या घटस्फोटानंतर आशा भोसले वयाच्या 47 व्या वर्षी दुसरं लग्न करण्यापूर्वी जवळपास 20 वर्षे अविवाहित राहिल्या. पुढं त्यांच्या आयुष्यात आले पंचम दा म्हणजे आर डी बर्मन. ते आशा भोसले यांच्यापेक्षा सहा वर्षांनी लहान होते. हे फक्त आशा भोसले यांचंच दुसरं लग्न नव्हतं, तर पंचम दा यांचंही दुसरं लग्न होतं. आर. डी. बर्मन यांच्याशी लग्न झाल्यावर आशा भोसले खूप आनंदी होत्या. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र गाणी संगीतबद्ध केली आणि गायली देखील. पण त्यांचं नातं फक्त 14 वर्षेच टिकलं, कारण आर. डी. बर्मन यांचंही निधन झालं आणि ते त्यांना सोडून गेले.

आशाताईंचंही पंचम दांवर प्रेम होतं पण त्यांनी लग्न करण्यास नकार दिला. खरं पंचम दा यांच्या आईंना आशाताईंसोबत त्यांचं लग्न मान्य नव्हतं. आशाताई आणि पंचम दा यांच्या लग्नासाठी लतादीदींनी पुढाकार घेतला. त्यानंतर 1980 मध्ये वयाच्या 47 व्या वर्षी आशा भोसले यांनी पंचम दांशी लग्न केलं. जेव्हा आर. डी. बर्मन यांचं आयुष्य घसरत होतं, संगीत कारकीर्द संपुष्टात येण्याच्या मार्गावर होती, तेव्हा आशा भोसले यांनी प्रत्येक पावलावर खंबीरपणे त्यांना साथ दिली. त्यांनी फक्त एक पत्नी म्हणूनच नाही तर एक खरी साथीदार म्हणून त्यांना साथ दिली.

अनेक ‘कडू घोट’ पचाविणाऱ्या आशाताई
आशाताई यांचे जीवन हे संघर्षपूर्ण राहिलेले आहे. संगीतामध्ये नाव कमविला असले तरी खासगी आयुष्यात अनेक धक्के त्यांना पचवावे लागले आहेत. आशा भोसले यांची कन्या वर्षा यांनी 2012 मध्ये आत्महत्या केली होती. तर मोठा मुलगा हेमंत यांचं आजारपणामुळे निधन झालं होते. तेही म्युझिक डायरेक्टर होते. तर तिसरा मुलगा आनंद भोसले हे संगीतविश्वापासून दूर आहेत. तर आशाताईंची नात जनाई भोसले ही चित्रपट विश्वात आहे.

follow us