Bade Miyan Chote Miyan चे टायटल ट्रॅक आऊट! अक्षय-टायगरची खास केमेस्ट्री दिसली

Bade Miyan Chote Miyan चे टायटल ट्रॅक आऊट! अक्षय-टायगरची खास केमेस्ट्री दिसली

Bade Miyan Chote Miyan : अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) सध्या त्यांच्या आगामी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ (Bade Miyan Chote Miyan Movie) या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहेत. एकीकडे चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत असताना दुसरीकडे नुकतच टायटल ट्रॅक रिलीज झालं असून अक्षय आणि टायगर यांची खास केमिस्ट्री यातून बघायला मिळणार आहे.

Bade Miyan Chote Miyan चे टायटल ट्रॅक आऊट! अक्षय-टायगरची खास केमेस्ट्री दिसणार

उत्तम अभिनयाच्या सोबतीने कमाल डान्स करणारी ही प्रसिद्ध ही जोडी जगभरातील चाहत्यांसाठी पर्वणी असणार आहे. धडधडणाऱ्या बीट्स आणि मनमोहक लय ही या टायटल ट्रॅक ची खासियत आहे. चित्रपटाच्या थरारक कथानकासह डान्स फ्लोअरवर अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफची केमिस्ट्री यातून हायलाइट होणार आहे. दोघांनी या बद्दलचा उत्साह सोशल मीडिया वर शेयर केला आहे.

महिलांचा अपमान करणारी, पोलिसांना आव्हाण देणारी हीच का भाजपची संस्कृती?, वडेट्टावारांचा थेट सवाल

विशाल मिश्रा यांनी तयार केलेल आणि अनिरुद्ध रविचंदर यांनी हे गाणं गायलं आहे. हे गीत इर्शाद कामिल यांनी लिहिलेले आहेत आणि बॉस्को-सीझर यांनी नृत्यदिग्दर्शित केले आहे. पूजा एन्टरटेन्मेंट आणि AAZ फिल्म्स निर्मित, आणि अली अब्बास जफर लिखित आणि दिग्दर्शित, बडे मियाँ छोटे मियाँ मध्ये पृथ्वीराज सुकुमारन, सोनाक्षी सिन्हा, मानुषी छिल्लर, अलाया एफ आणि रोनित रॉय यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. त्यामुळे खिलाडी कुमार आणि बॉलीवूडचा सर्वात तरुण ॲक्शन सुपरस्टार, टायगर श्रॉफ, या ईदमध्ये त्यांचा ‘टायगर इफेक्ट’ प्रदर्शित करत असलेल्या रोमांचकारी राइडसाठी तयार व्हा!

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टारर ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ 2024 च्या ईदच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये दाखल होणार आहे. याआधी जवळपास 75 दिवस या चित्रपटाचे प्रमोशन केले जाणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार हा चित्रपट पाच भाषांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube