Song Out Now : ‘बांबू’ चित्रपटातील रोमॅंन्टीक गाणे रिलीज

Song Out Now : ‘बांबू’ चित्रपटातील रोमॅंन्टीक गाणे रिलीज

मुंबई : काही दिवसांपूर्वीच ‘बांबू’चा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्यानंतर आता बांबू चित्रपटातील रोमॅंन्टीक गाणे रिलीज झाले आहे. ‘प्रेमाचा बाण बदामी’ असं या गाण्याचं नाव आहे. येत्या व्हॅलेंटाईन डेला हे गाणं स्पेशल ठरणार आहे. ‘प्रेमाचा बाण बदामी’ हे गाणं अवधूत गुप्ते यांनी गायलं आहे. संगीत समीर साप्तिसकर यांनी दिलं असून तर अभिषेक खणकर यांनी हे गाणे लिहीले आहे.

विशेष म्हणजे ‘बांबू’ तेजस्विनी पंडीतचीही झलक दिसली. त्यामुळे प्रेक्षकांना डबल धमाका अनुभवायला मिळणार आहे. विशाल सखाराम देवरुखकर दिग्दर्शित ‘बांबू’ चित्रपट येत्या 26 जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटात अभिनय बेर्डे, वैष्णवी कल्याणकर, पार्थ भालेराव, शिवाजी साटम, अतुल काळे, समीर चौघुले, स्नेहल शिदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन निर्मित या चित्रपटाचे तेजस्विनी पंडित, संतोष खेर निर्माते आहेत. तर ‘बांबू’ चे लेखन अंबर हडप यांनी केले आहे.

‘बांबू’ची कथा तरुणाईवर आधारित असली तरी हा एक कौटुंबिक चित्रपट आहे. कोणत्याही वयोगटातील प्रेक्षकाला हा चित्रपट भावणारा आहे. मुळात या चित्रपटात अत्यंत दिग्गज, संवेदनशील आणि जबाबदार कलाकार आहेत. प्रत्येकाची एक शैली आहे. या चित्रपटात माझीही एक भूमिका आहे. आता ही भूमिका काय आहे, हे जाणून घ्यायला तुम्हाला ‘बांबू’ पाहावा लागेल.’

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube