Bhairavi Vaidya Passed Away : ज्येष्ठ अभिनेत्री भैरवी वैद्य यांचे निधन, कर्करोगाशी झुंज अपयशी
Bhairavi Vaidya Passed Away : ज्येष्ठ अभिनेत्री भैरवी वैद्य (Bhairavi Vaidya Passed Away) यांचं निधन झालं. त्या 67 वर्षांच्या होत्या. त्यांच्या जाण्याने मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्या गेल्या सहा महिन्यांपासून कर्करोगाशी झुंज देत होत्या. मात्र अखेर ही झुंज अपयशी ठरली आहे. त्यांनी जवळपास 45 वर्ष मनोरंजनसृष्टीमध्ये काम केलं आहे.
Dance Plus साठी स्पर्धक सज्ज, नवा कोरा सीजन येणार प्रेक्षकांच्या भेटीला
अनेक चित्रपटांमध्ये साकारल्या भूमिका…
भैरवी यांनी अनेक चित्रपटांसह टीव्हि मालिकांध्ये अनेक भूमिका साकरलेल्या आहेत. तर हिंदीसह त्यांनी गुजराती चित्रपटामध्ये देखील काम केलं. नीमा डेन्जोंगपा या मालिकेतील त्यांच्या पुष्पा या भूमिकेचं विशेष कौतुक झालं. तसेच सलमान खानच्या चोरी चोरी चुपके चुपके, एश्वर्या रॉय बच्चनच्या ताल चित्रपटामध्ये त्यांनी जानकी ही भूमिका साकरली होती. या चित्रपटातूनच त्यांनी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केलं होतं.
मुंबईच्या एन्ट्री पॉईंटवरील टोलनाक्यांवर आता ‘ठाकरें’चा वॉच; मनसेचे कॅमेरे ठेवणार लक्ष
त्याचबरोबर व्हॉट्स योर राशी, हमराज, क्या दिल ने कहा व्हेंटिलेटरमध्ये त्या प्रतिक गांधीसोबत दिसल्या होत्या. या चित्रपटांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकरली होती. त्यामुळे त्यांच्या जाण्याने चित्रपट आणि टीव्ही विश्वास मोठं नुकसान झालं आहे. त्यांच्या निधनावर अनेक कलाकारांनी देखील शोक व्यक्त केला आहे.