लेक वणव्यामध्ये गारव्यासारखी! वडिलांबद्दल बोलताना भाऊ कदमची लेक भावूक, अभिनेता पोस्ट करत म्हणाला…

लेक वणव्यामध्ये गारव्यासारखी! वडिलांबद्दल बोलताना भाऊ कदमची लेक भावूक, अभिनेता पोस्ट करत म्हणाला…

Bhau Kadam celebrated his 50th birthday : अभिनेता भाऊ कदम (Actor Bhau Kadam) हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya ) या शोमधून भाऊ कदमने अभिनेता म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्याने आजवर अनेक चित्रपटांत आणि चला हवा येऊ द्या या शोमध्ये काम करुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आज मराठी इंडस्ट्रीतील विनोदी अभिनेता म्हटलं की चटकन भाऊ कदमांचं नाव समोर येतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhau Kadam (@bhaukadamofficial)


भाऊ कदमने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर शून्यातून स्वतःचं विश्व निर्माण केलंय. भाऊ कदमच्या आयुष्यात आणखी एक यशस्वी टप्पा पार झाला आहे. विनोदी अभिनयाने चाहत्यांच्या मनावर छाप पाडणाऱ्या (bhau kadam celebrated his 50th birthday) भाऊचा ५०वा वाढदिवस कुटुंबियांनी मोठ्या दणक्यात साजरा केला. भाऊने ५०व्या वाढदिवस सेलिब्रेशनमधील एक व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

या खास क्षणी भाऊ कदमच्या कन्येने त्याच्याप्रती असलेल्या तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. मृणाल म्हणाली, ‘मी पप्पांना पत्र लिहिण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, मी पत्राच्या पानावर माझ्या भावना मांडू शकले नाही. मी आजपर्यंत खूप स्पर्धांमध्ये निबंध लिहिले आहेत. पण नेहमीच आईविषयी विचारलं जात असायचं पण कधीच वडिलांविषयी लिहिण्यासाठी सांगण्यात येत नाही. मला वडीलानसारखी असल्याचा मला अभिमान आहे.

रामायणचे अभिनेते शूटिंग वेळी ओढायचे सिगारेट, एक दिवशी चाहत्याने पाहिलं, अन् मग….

मी कधी चुकले असेल तर सॉरी बाबा आणि या सगळ्यासाठी थँक्यू, आज सर्वजण मला भाऊ कदम यांची मुलगी म्हणून ओळखतात. मी आता सध्या जे काही आहे ते फक्त तुमच्यामुळे आहे, असं म्हणताना मृणाल भावुक झाल्याचे बघायला मिळाल आहे. बाबांबद्दलच्या भावना व्यक्त करताना मृणालचे डोळे पाणावले होते. भाऊ कदमने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन लेकीचा हा व्हिडीओ शेअर करत “निशब्द” असं कॅप्शन दिले आहे. त्याच्या या व्हिडीओवर प्रेक्षकांनी चांगल्या कमेंट देखील केल्या आहेत. विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळवून हसवणारा भाऊ कदम सध्या ‘चला हवा येऊ द्या’ शोमधून चाहत्यांचे मोठे मनोरंजन करत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube