Grand Finale : कोण ठरणार ‘Bigg Boss 16’ चा विजेता?

Untitled Design (44)

मुंबई : लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 16’ चा ग्रँड फिनाले आज रंगणार आहे. यंदाच्या सीझनची बिग बॉसची ट्रॉफी कोण घरी घेवून जाणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागलं आहे. ‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16) चा फिनाले आज रात्री पार पडणार आहे. दरम्यान शोच्या फिनालेची तयारी पूर्ण झाली आहे. शोच्या विजेत्याच्या नावाची घोषणा देखील आज मोठ्या थाटात केली जाईल. यावेळी विजेत्याचा मुकुट कोणाला मिळणार हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण खूप उत्सुक आहे.

हे स्पर्धक आहेत फायनल रेसमध्ये
बिग बॉस 16 चा फिनाले आज आहे. स्पर्धेतील अंतिम रेसमध्ये प्रियांका चहर चौधरी, शिव ठाकरे, एमसी स्टेन, अर्चना गौतम आणि शालिन भानोत हे पाचजण आहे. दरम्यान हा प्रसिद्ध आणि लोकप्रिय Reality शो बॉलिवूड अभिनेता सलमान खान होस्ट करत आहे.

दरम्यान शनिवारच्या एपिसोडमध्ये चित्रपट निर्माता रोहित शेट्टीची घरामध्ये ग्रँड एन्ट्री झाली होती. रोहितने कुटुंबातील सदस्यांना धोकादायक स्टंट करायला लावले. या दरम्यान, पाण्याखाली स्टंट करताना एमसी स्टॅनची प्रकृती बिघडते. त्याचवेळी अर्चना गौतमलाही परफॉर्म करता आला नाही.

रोहितने या स्पर्धकांकडून हे स्टंट करून घेतले.कारण रोहितचा आगामी कार्यक्रम ‘खतरों के खिलाडी’ हा येत आहे. या शो द्वारे रोहित आपल्या आगामी शोसाठी कोणाला ऑफर करणार हे देखील पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

प्रियांका आणि शिव सीझन 16 मधील सर्वात शक्तिशाली खेळाडू आहेत. दोघेही सुरुवातीपासूनच मनापासून खेळ खेळत आहेत. प्रियांका आणि शिव या दोघांनीही नेहमीच फ्रंटफूटवर राहून प्रत्येक मुद्दा मोठ्या आवाजात मांडला आहे. दोघांचा खेळ प्रेक्षकांनाही आवडला आहे. प्रियांका आणि शिव ट्रॉफी जिंकण्याच्या शर्यतीत एकमेकांना खडतर स्पर्धा देत आहेत. या दोघांपैकी एक बिग बॉसचा विजेता होईल, असे मानले जात आहे.

Tags

follow us