सुशांतचे रोमँटिक सीन पाहिल्यावर, बिग बॉस’च्या घरात अभिनेत्रीचा खुलासा; म्हणाली, “जेव्हा तुमचा बॉयफ्रेंड…”

  • Written By: Published:
सुशांतचे रोमँटिक सीन पाहिल्यावर, बिग बॉस’च्या घरात अभिनेत्रीचा खुलासा; म्हणाली, “जेव्हा तुमचा बॉयफ्रेंड…”

Bigg Boss 17 : ”बिग बॉस 17′ (Bigg Boss 17) सुरू होऊन 10 आठवडे पूर्ण झाले आहेत. हा शो पहिल्या दिवसापासूनचं जोरदार चर्चेत आहे. सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) देखील पती विकी जैनसोबत (Vicky Jain) या शोमध्ये एन्ट्री घेतली आहे. अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे बिग बॉस 17 चे प्रबळ स्पर्धक मानले जातात. मात्र, दोघांमधील भांडण चाहत्यांचे कायम लक्ष वेधून घेत आहे.


अंकिता लोखंडे पतीसोबत शोमध्ये गेली असली तरी तिला अनेकदा तिचा एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आठवणीत सतत भाष्य करताना दिसत असते. पुन्हा एकदा अंकिता लोखंडे सुशांतच्या आठवणीत हरवलेली दिसली आहे. अंकिताने नुकतचं सांगितले की, जेव्हा ती सुशांत सिंगला चित्रपटांमध्ये दुसऱ्या कोणाशी रोमान्स करताना पाहायची तेव्हा खूप रडायची आणि त्याच्यावर चिडायची.

अंकिताला कायम सुशांतची आठवण

अभिषेक सिंह, आयेशा खान, अनुराग डोवाल आणि अंकिता लोखंडे आपापसात बोलताना दिसले. यादरम्यान अभिषेकने ‘उडानिया’च्या सेटवर सांगितले की, ‘जेव्हा ईशा मालवीय लग्न करत होती, तेव्हा तो तिच्या प्रेमात वेडा झाला होता. यानंतर त्याने सगळ्यांशी भांडण केले आणि नंतर स्वतः ईशासोबत लग्नगाठ बांधला, यावर अंकिता म्हणाली की, ‘माझ्यासोबतही असेच घडले आहे. जेव्हा सुशांतचा’शुद्ध देशी रोमान्स’ आला तेव्हा सुशांतने माझ्यासाठी संपूर्ण थिएटर बुक केले होते. कारण त्याच्यासोबत अभिनेत्री रोमँटिक सीन्स पाहिल्यावर मला राग येईल हे त्याला चांगलेच माहीत होते.

अभिनेता रोनित रॉय वयाच्या 58व्या वर्षी तिसऱ्यांदा बोहल्यावर! कोणासोबत थाटला संसार?

अंकिता पुढे म्हणाली की, ‘जेव्हा त्याने हे पाहिले तेव्हा तो चित्रपट सोडून पळून गेला आणि जेव्हा मी संपूर्ण चित्रपट पाहून घरी पोहोचले तेव्हा मी खूप रडले. सुशांतही रडायला लागला. यानंतर तो म्हणाला की, मला माफ कर गुगू, मला माफ कर गुगू. मी आता ते सीन्स करणार नाही. मग जेव्हा आम्ही रोमँटिक झालो तेव्हा माझ्या मनात चित्रपटाची सीन्स डोळ्यासमोर चमकू लागली. मी स्वतःला त्याच्यापासून दूर केले. असे होते की जेव्हा तुम्ही तुमचा पार्टनर दुसऱ्याला किस करताना पाहता तेव्हा ते तुमच्या मनाला लागते. ‘पीके’ बघूनही माझं डोकं फिरत होतं. विकीसुद्धा माझे रोमँटिक सीन्स कधीच पाहू शकत नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube