पुण्यात हाय व्होल्टेज ड्रामा! ना पोलीस संरक्षण, ना ताफा अजित पवार एकटेच कुठे रवाना? चर्चांना उधाण
Ajit Pawar हे पोलीस संरक्षण आणि पोलीस ताफा सर्व काही बाजूला ठेवून एकटेच कुठे तरी रवाना झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.
Ajit Pawar go alone without police protection or fleet after Disccusions Both NCP alliance collapsed : मागील बऱ्याच दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी(NCP) आगामी महापालिका निवडणूका सोबत लढवणार असल्याचा चर्चा होत्या. मात्र उलट ही युती फिस्कटली असल्याचं सांगितल जात आहे. याला अजित पवारांनी केलेल्या मागणीचं कारण दिलं जात आहे. तसेच त्यानंतर अजित पवार हे पोलीस संरक्षण आणि पोलीस ताफा सर्व काही बाजूला ठेवून एकटेच कुठे तरी रवाना झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.
नेमकं काय घडलं?
नेहमीच्या कार्यक्रमासाठी अजित पवार ही बारामती होस्टेल या ठिकाणी आले होते. मात्र या ठिकाणहून ते अचानक निघून गेले. यावेळी त्यांनी पोलीस संरक्षण आणि पोलीस ताफा सर्व काही बाजूला ठेवून गेले होते. तर त्यांचे वाहन जिजाई या त्यांच्या निवासस्थानी होतं. त्यानंतर त्यांनी ताफा मागवून घेतला. पुण्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीबाबतचे चर्चा फिस्कटल्यानंतर अजित पवारांनी हे पाऊल उचललं आहे.
मिनी मंत्रालयांचा बिगुल वाजणार! कसा असणार जिल्हा परिषदांसह पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम
अजित पवार अशा प्रकारे एकटेच निघून जाणे किंवा गायब असणे हे काही नवीन नाही मात्र यावेळी त्यांच्या या जाण्यामागे एक पार्श्वभूमी आहे. कारण एकीकडे मागील बऱ्याच दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी(NCP) आगामी महापालिका निवडणूका सोबत लढवणार असल्याचा चर्चा होत्या. ही युती फिस्कटल्याचं सांगितलं जात आहे. तर अजित पवारांची गाडी जिजाई घराजवळ असतानाच तेथून अमोल कोल्हे अजित पवारांच्या जिजाई निवासस्थानातून बाहेर पडले. त्यामुळे कोल्हे आणि अजित पवारांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.
उत्तरेतील शीतलहरींमुळे महाराष्ट्रात पुढील 24 तासांत थंडीचा जोर वाढणार; हवामान विभागाचा अंदाज
तर दुसरीकडे उद्या रविवारी बारामतीमध्ये उद्योजक गौतम अदानी येणार आहेत. यावेळी शरद पवारांची उपस्थितीमध्ये बारामतीमध्ये उद्योजक गौतम अदानी यांचा एक कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. त्या कार्यक्रमाला अजित पवार देखील उपस्थित राहणार आहेत.
