Bigg Boss 17: नव्या पर्वात बिग बॉसची तीन रुपं बघायला मिळणार; Promo viral

Bigg Boss 17: नव्या पर्वात बिग बॉसची तीन रुपं बघायला मिळणार; Promo viral

Bigg Boss 17: टेलिव्हिजनवरील वादग्रस्त शो बिग बॉसचा नवा १७ वा सिझन आला आहे. दरवर्षीप्रमाणे यावेळी देखील भाईजान म्हणजेच चाहत्यांचा लाडका अभिनेता सलमान खानच (Salman Khan) शो होस्ट करणार आहे. ‘बिग बॉस 17’ (Bigg Boss 17) चा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. (Social media) भाईजानने हटके एंट्री घेत प्रोमोमध्ये चार चाँद लावले आहे. (Promo viral) यामुळे चाहत्यांची देखील आता चांगलीच उत्सुकता ताणली आहे. १७ व्या सिझनची नेमकी काय थीम राहणार आहे. कोण प्रेक्षक असणार हे लवकरच समजणार आहे.

https://www.youtube.com/watch?v=6T2Jqhk8vEI

‘कलर्स टीव्ही’ने सोशल मीडियावर प्रोमो व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यावेळी ‘बिग बॉसमध्ये एक वेगळाच अनोखा बघायला सगळे ‘दंग’ करणारा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. भाईजान हटके एंट्री घेत म्हणतो, ‘आतापर्यंत तुम्ही बिग बॉसचा फक्त डोळा बघितला आहे. आता दिसणार बिग बॉसचे तीन अवतार- दिल, दिमाग आणि दम, आतासाठी एवढेच प्रोमो संपला.’ हा प्रोमो काही तासामध्ये जोरदार व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)


बिग बॉसचे नवीन कोणता रूप बघायला मिळणार आहे, यासाठी चाहते देखील आतुर झाले आहेत. बिग बॉसचा गेल्या  १६ वा सिझनचा प्रसिद्ध रॅपर एमसी स्टॅन विजेता ठरला होता. एमसी स्टॅनला चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते. तर नंतर बिग बॉसचा ओटीटी सिझन देखील आला, ज्याचा विजेता एल्विश यादव ठरला होता. आता एल्विशला देखील  बिग बॉस १७ मध्ये घेऊन या अशी मागणी सध्या चाहते करत आहे. एकूणच ‘बिग बॉस 17’ साठी सर्वच सज्ज होत आहेत.

Hemangi Kavi: किंग खानचा ‘जवान’ बघताच हेमांगी कवी थिएटरमध्ये थिरकली; व्हिडीओ व्हायरल

तसेच बिग बॉस सीझन १७ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रोमोमध्ये शोच्या ग्रँड प्रीमियरची सध्या तारीख जाहीर करण्यात आली नाही. परंतु १५ ऑक्टोबर दिवशी हा शो सुरू केला जाऊ शकतो, अशी चर्चा सध्या रंगत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube