Sonali Patil: ‘लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज?’ देवमाणूस मधील अभिनेत्रीने थेटच सांगितलं, म्हणाली…

Sonali Patil: ‘लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज?’ देवमाणूस मधील अभिनेत्रीने थेटच सांगितलं, म्हणाली…

Sonali Patil Post: ‘देवमाणूस’ या मराठी सिरियलमुळे (Marathi serial) प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री सोनाली पाटील (Sonali Patil ) सोशल मीडियावर (social media) कायम सक्रिय असल्याचे पाहायला मिळत असते. ती नेहमी फोटो, रील्स पोस्ट करून चाहत्यांचे सतत मनोरंजन करत असते. गेल्या काही दिवसाखाली तिनं तमन्ना भाटियाच्या ट्रेंडिंग ‘कावाला’ गाण्यावर देखील रील केल्याचे पाहायला मिळाले होते. हा तिचा रील चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले होते. अशातच आता अभिनेत्रीनं ‘लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज?’ या सवालावर रीलच्या माध्यमातून थेटच उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonali Patil (@sonale_paatil42)


अभिनेत्री सोनाली पाटीलने एक रील पोस्ट केला आहे. या रीलवर बिग बॉसच्या घरातील तिचा खास मित्र अभिनेता विकास पाटील याने एक मजेशीर कॉमेंट केल्याचे पाहायला मिळाले आहे. या रीलमध्ये सोनालीला विचारलं जात की, ‘तू लव्ह मॅरेज करणार की अरेंज मॅरेज.’ तर ती म्हणते की, ‘नो मॅरेज.’ सोनालीनं हा रील पोस्ट करत असताना सुद्धा ‘नो मॅरेंज’ असं कॅप्शन दिल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे ती सध्या जोरदार चर्चेत आल्याचे पाहायला मिळत आहे.

या रीलवर अभिनेता विकास पाटील देखील भन्नाट प्रतिक्रिया देत सांगितले आहे की, “आईचा फोन आला होता परवा…मुलं बघ आमच्या सोनासाठी म्हणून…” तसेच सोनालीच्या चाहत्यांनी देखील या रीलवर जोरदार प्रतिक्रिया देत असल्याचे पाहायला मिळत आहे. एकाने सांगितले आहे की, “उत्तर एकदम झक्कास आहे. एकटा जीव सदाशिव… ” तर काहींनी तिला लग्न करू नको असा सल्ला दिल्याचे देखील पाहायला मिळत आहे.

Ishq Ka Asar : तुमचे क्षण सुंदर करायला आलंय, स्टॅबिन बेन आणि योगिता बिहानीचं नवं गाणं…

तसेच सोनालीने ‘बिग बॉस मराठी’ त्या अगोदर ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘वैजू नंबर वन’ या लोकप्रिय सीरियलमध्ये काम केले आहे. त्यानंतर ती ‘जुळता जुळता जुळतंय की’, ‘देवमाणूस’ यांसारख्या गाजलेल्या सिरीयलमध्ये झळकल्याचे पाहायला मिळाले आहे. एवढंच नाहीतर सोनालीनं हिंदी सिरीयल मध्ये देखील काम केले आहे. ‘वागले की दुनिया’ या हिंदी सीरियलमध्ये ती दिसून आली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube