Bigg Boss OTT 2: जैद हदीद अन् आकांक्षाच्या लिप किस..; Video पाहून नेटकऱ्यांना फुटला घाम!

Bigg Boss OTT 2: जैद हदीद अन् आकांक्षाच्या लिप किस..; Video पाहून नेटकऱ्यांना फुटला घाम!

Bigg Boss OTT 2: बिग बॉस ओटीटीचा सध्या दुसरा सिझन सुरु झाला आहे. पहिल्याच दिवसांपासून वादात आणि चर्चेत आहे. परंतु आतापर्यंत घरातील एकूण ३ एलिमेशन झाले आहेत. या एलिमेशनमध्ये पुनित, पलक आणि आलिया यांना घराच्या बाहेरचा रस्ता धरावा लागला आहे. यावेळेस बिग बॉस ओटीटी हा पुर्णपणे वेगळा करण्याचा प्रयत्न निर्माते करत असल्याचे दिसून येत आहे. या बिग बॉसच्या शोमध्ये अनेक नवीन किस्से होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये आता किसिंग सीनही (kissing scene) दाखवण्यात आला आहे.

दुबईचा मॉडेल जैद हदीदने (Jad Hadid)  हा ‘बिग बॉस OTT 2’ हा त्याच्या आकर्षक लूकमुळे (Akanksha Puri) पहिल्या दिवसापासूनच चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाला आहे. त्याच्या आयुष्याबद्दलच्या स्टोरीने देखील चाहते भावुक झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे पहिल्या दिवसापासूनच तो चांगलंच चर्चेत आहे. त्यातमध्ये आता शोने बोल्डनेसची सर्वच हद्द पार केली आहेत. शोच्या नवीन एपिसोडमध्ये जैद हदीद आणि आकांक्षा पुरी फ्रेंच एकमेकांना किस करत असल्याचे दिसून आले आहे. या दोघांचा हा किसिंग सीन साधारण ३० सेकंदापेक्षा जास्त चालू होता.

ज्याचा व्हिडीओ देखील सोशल मिडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे. हदीदच्या या देखण्या रुपाने  आणि उत्तम वागण्याने त्याने घरातील सर्वांची मनं जिंकली आहेत. परंतु आता चाहत्यांना त्याच वागणं चांगलंच खटकलं आहे. तो सुरवातीपासून आकांक्षा पुरीबरोबर फ्लर्ट करत असल्याचा दिसून आला. गेल्या काही दिवसापूर्वी देखील त्याने आकांक्षाला स्पर्श देखील केला होता. त्यामुळे त्याला सोशल मिडियावर त्याला ट्रोल करण्यात आले होते. यावेळी त्याने स्पष्टीकरण देत असताना सांगितले आहे की त्याच्यासाठी त्याच्या जवळच्या व्यक्तीला किंवा मित्रांना शारीरिकरित्या स्पर्श करणे म्हणजे त्याच्याबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त करणे असं आहे.

Ravi kishan: सुप्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्याची लेक होणार भारतीय सैन्यात भरती; जाणून घ्या तिच्याबद्दल

परंतु चाहत्यांना प्रेम आणि आदराच्या नावाखाली तो सर्वांशी जवळीक वाढवत असल्याचे दिसून आला आहे. परंतु आता नवीन एपिसोडमध्ये, अविनाशने दिलेल्या एका टास्कमध्ये दोघेही किस करताना दिसून आले आहेत. त्यानंतर सायरस, अभिषेक, जाद आणि आकांशा बोलत आहेत आणि जादची जोरदार चेष्टा करत असल्याचे दिसून आले आहेत. यावेळी जैद म्हणतो की, खरं तर  मला तूला किस करायचेच होते, तुझे ओठ खूप सुंदर आहेत. याअगोदर काही दिवसांपूर्वी जेव्हा या जैद हदीदने मनीषाला देखील फ्रेंच किसकरिता विचारण्यात आले होते.

टास्कच्या नावाखाली नॅशनल ओटीटी प्लॅटफॉर्मवर आकांक्षा आणि जैद यांनी केलेल किस नेटकऱ्यांना आवडले नाही. यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी मोठा संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर एका यूजरने सांगितले की, जिओवरही लव्ह स्टोरी सुरु झाली आहे. तर काही थेट भाईजानवर जोरदार हल्लबोल करत आहेत. सोशल मिडियावर जैद, आकांक्षा आणि मनिषाला चाहते मोठ्या प्रमाणात ट्रोल करत आहे. परंतु आता विकेंड दिवशी भाईजान काय बोलणार, तसेच कुणाची शाळा घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube