Shahid Kapoor: शाहिद कपूरच्या ‘ब्लडी डैडी’चे पोस्टर आऊट, पुन्हा एकदा दमदार भूमिकेत

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 13T160618.151

Shahid Kapoor Bloody Daddy First Look Poster Out : अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) सध्या चर्चेत आहे. त्याच्या आगामी ‘ब्लडी डॅडी’ (Bloody Daddy) या सिनेमाचं पोस्टर आता आऊट करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये शाहिदचा एक आगळा वेगळा अवतार चाहत्यांना बघायला मिळणार आहे. शाहिद कपूरने सोशल मीडियावर ‘ब्लडी डॅडी’ या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शीत केलं आहे.

या पोस्टरमध्ये शाहिद कपूर खूपच रागात असलयाचे दिसून येत आहे. नाकावर जखम, डोळ्यात आग आणि शर्टावर रक्ताचे डाग असा काहीसा शाहिद कपूरचा लूक दिसून येत आहे. पोस्टर शेअर करत शाहिदने लिहिले आहे की, ब्लडी डॅडी’चा टीझर लवकरच आऊट होणार आहे.

शाहिदच्या ‘ब्लडी डॅडी’चं पोस्टर सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अली अब्बास जफरने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली असल्याची माहिती मिळाली आहे. ‘ब्लडी डॅडी’ या सिनेमाअगोदर अली अब्बास जफरने बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या ‘सुलतान’ या सिनेमाचे देखील दिग्दर्शन केलं होतं. आता ‘ब्लडी डॅडी’ या सिनेमातील शाहिद कपूरच्या लुकचं चाहत्यांकडून प्रचंड कौतुक होत आहे.

‘ब्लडी डॅडी’ हा शाहिदचा थरार नाट्य असणारा सिनेमा आहे. या सिनेमामध्ये चाहत्यांना अॅक्शनचा तडका बघायला मिळणार आहे. या सिनेमामध्ये रोनित रॉय, संजय कपूर, डायना पेंटी आणि विवान भतेना महत्त्वाच्या भूमिकेमध्ये झळकणार आहेत. ‘ब्लडी डॅडी’ सिनेमाचे पोस्टर शेअर करत रोनितने लिहिले आहे,या सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान मी खूप उत्सुक असलयाचे त्याने यावेळी सांगितले. आता हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याने माझी उत्सुकता आणखीच वाढली आहे. ‘ब्लडी डॅडी’ हा सिनेमा २०११ साली प्रदर्शित झालेल्या ‘Nuit Blanche’ या फ्रेंच सिनेमाचा हिंदी रिमेक असलयाचे त्यांनी सांगितले.

Sanjay Dutt Injured : दुखापतीनंतर संजय दत्तच्या प्रकृतीबद्दल महत्त्वाची अपडेट समोर

‘ब्लडी डॅडी’ या सिनेमाअगोदर शाहिद कपूर (Shahid Kapoor) ‘फर्जी’ (Farzi) या वेबसीरिजमध्ये दिसून आला. या सीरिजमध्ये त्याने आपल्या अभिनयाने चाहत्यांना चांगलेच वेड लावले होते. राज आणि डीके दिग्दर्शित या सीरिजमध्ये शाहिद कपूरने सनी हे पात्र साकारले आहे, या सीरिजमधील विजय सेतुपती आणि राशी खन्नाच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होते.

Tags

follow us