कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ला ग्रीन सिग्नल; 3 कट्स अन् 10 बदलांसह चित्रपट होणार प्रदर्शित
Kangana Ranaut Emergency Movie Release : बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणावतचा (Kangana Ranaut) इमर्जन्सी चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या वादामुळे चित्रपट शुक्रवारी (Emergency Movie Release) रिलीज झाला नाही. या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. सेन्सर बोर्डानेही या चित्रपटातील काही सीन्सना कात्री लावली. आता कंगनाला या प्रकरणी दिलासा मिळाला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने (CBFC) तीन कट आणि एकूण 10 बदलांसह चित्रपटाला ‘UA’ सर्टिफिकेट देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कंगनाच्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
Kangana Ranaut : ..म्हणून कंगना रनौतच्या ‘Emergency’ ची ‘रिलीज डेट’ ढकलली पुढे !
सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने वादग्रस्त अशा ऐतिहासिक वक्तव्यांसंदर्भात चित्रपटाच्या निर्मात्यांकडे पुरावे मागितले आहेत. तसेच चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी काही अटी ठेवल्या. यामध्ये तीन प्रकारचे मजकूर काढून टाकण्याची अट सेन्सॉर बोर्डाने ठेवली. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती रिचर्ड निक्सन यांनी भारतीय महिलांबाबत केलेले अपमानजनक वक्तव्य तसेच इंग्लंडचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचे वादग्रस्त वक्तव्यांचा यामध्ये समावेश आहे. बोर्डाने या वक्तव्यांचे पुरावे चित्रपट निर्मात्यांकडे मागितले आहेत.
कंगनाचा चित्रपट याआधी 6 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र सेन्सॉर बोर्डाच्या परवानगीशिवाय चित्रपट प्रदर्शित करता येणार नव्हता. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. आता सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला UA सर्टिफिकेट दिले आहे. त्याामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. इंडियन एक्सप्रेसने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील काही दृश्यांना काढून टाकण्यास सांगितले आहे. त्यातील एका दृश्यात पाकिस्तानी सैनिक बांग्लादेशी निर्वासितांवर हल्ला करताना दिसत आहेत. चित्रपटात एका नेत्याचा मृत्यू झाल्यानंतर समोरच्या जमावातून दिल्या गेलेल्या घोषणेवर बोर्डाने आक्षेप घेतला असून बदलण्याची सूचना केली आहे. तसेच एका वाक्यात घेण्यात आलेलं एक आडनावही बदलण्यास सांगण्यात आले आहे.
Kangana Ranaut: मी माझ्या देशावर नाराज! इमर्जन्सीची रिलीज डेट पुढे ढकलली; अभिनेत्री दुखावली
कंगना राणौतच्या ‘इमर्जन्सी’वर कधी येणार निर्णय?
उच्च न्यायालयाने आता सीबीएफसीला 18 सप्टेंबरपर्यंत प्रमाणपत्रावर निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर १९ सप्टेंबर रोजी या याचिकेवर पुन्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनावर जबलपूर उच्च न्यायालयाने बंदी घातली होती.