‘गणपत’नंतर टायगर श्रॉफ दिसणार ‘या’ नव्या चित्रपटात, चाहत्यांमध्ये उत्सुकता

  • Written By: Published:
‘गणपत’नंतर टायगर श्रॉफ दिसणार ‘या’ नव्या चित्रपटात, चाहत्यांमध्ये उत्सुकता

Tiger Shroff : टायगर श्रॉ (Tiger Shroff) हा बॉलिवूडमधला आघाडीचा अभिनेता आहे. त्याच्या अॅक्शन चित्रपटांचा वेगळा चाहता वर्ग आहे. टायगरने आजवर अनेक दर्जेदार चित्रपट देऊन इंडस्ट्रीत आपलं सुपरस्टार म्हणून स्थान निर्माण केलं. एक डायनॅमिक परफॉर्मर, एक अफलातून डान्सर आणि अॅक्शन हिरो अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या टायगर लवकरच आपल्या नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

टायगरनं २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या हिरोपंती या चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. टायगरच्या हिरोपंतीनेने ७२.६ कोटीचा गल्ला गोळा केला होता. तर बागी हा ब्लॉकबस्टर ठरला होता. बागीने बॉक्स ऑफिसवर 524 कोटी कमावले.

दर्जेदार अॅक्शन सीक्वेन्ससह आणि टायगरच्या प्रभावी मार्शल आर्ट कौशल्याने प्रेक्षकांना कायम भुरळ घातली आहे. बॉक्स ऑफिसवर हीट ठरलेल्या वॉरने 475 कोटी कमावले. हृतिक आणि टायगर ची कमाल केमिस्ट्री यातून प्रेक्षकांनी अनुभवली.

टायगरच्या सरासरी चित्रपटांनी त्याच्या निर्मात्यांची कमाई कायम केली यात शंका नाही. आजवर टायगरच्या प्रत्येक सिनेमाने बॉक्स ऑफि वर उत्तम कमाई केली. यात स्टुडंट ऑफ द इयर 2 (98.6 कोटी), मुन्ना मायकल (47.20 कोटी) ए फ्लाइंग जट (56.13 कोटी) या चित्रपटाचा समावेश होता. त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत त्याच्याकडे फक्त दोन फ्लॉप्स ठरले. गणपत हा टायगरचा सर्वात फ्लॉप चित्रपट ठरला होता. मात्र, टाइगरचे फॅन्स फॉलोइंग हे कायम आहे.

टायगर श्रॉफ, कृती सेनॉन आणि अमिताभ बच्चन स्टारर ‘गणपत’ हा सिनेमा 20 ऑक्टोबरला रिलीज झाला होता. अवघ्या एका आठवड्यात ‘गणपत’ने बॉक्स ऑफिसवरू आपला गाशा गुंडाळला होता. गणपथ नंतर टायगर त्याच्या आगामी चित्रपटांसह प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी सज्ज आहे. टायगर हा अक्षय कुमार सोबत “बडे मियाँ छोटे मियाँ” मध्ये अभिनय करत आहे.

सणासुदीच्या दिवसात फॅशन डिझायनर कुणाल रावल यांचं खास फेस्टिवल लूक 

पृथ्वीराज सुकुमारन याचाही बडे मियाँ छोटे मियाँ चित्रपटात अभिनय आहे. बडे मियाँ छोटे मियाँचे दिग्दर्शन अली अब्बास जफर करत आहे. त्याने यापूर्वी टायगर जिंदा है सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. दरम्यान, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा एक अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट असून तो हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होईल. ख्रिसमसला हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

सिद्धार्थ आनंद निर्मित टायगरने अलीकडेच हैदराबादमध्ये रोहित शेट्टीच्या सिंघम अगेनसाठी काही नेत्रदीपक अँक्शन स्टंट केले आहेत. टायगर हा आता नव्या प्रोजेक्टच्या सोबतीने प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube