चार मित्रांचं बिनधास्त जगणं आणि ‘मांजर’ची धमाल! टीझरने वाढवली उत्सुकता

Manjar च्या पोस्टरने काही दिवसांपूर्वी हे विश्व प्रेक्षकांसमोर आणताच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती.

Manjar

Carefree lives of four friends and fun-filled antics of Manjar teaser has sparked curiosity : चार मित्र, त्यांचं बिनधास्त जगणं आणि त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या भन्नाट गोष्टी… ‘मांजर’च्या पोस्टरने काही दिवसांपूर्वी हे विश्व प्रेक्षकांसमोर आणताच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. आता ‘मांजर’चा टीझर प्रदर्शित झाला असून या चित्रपटातील मैत्री, धमाल आणि गोंधळाची झलक पाहायला मिळत आहे.

दोषीला कठोर शिक्षा द्या; जुन्नर तालुक्यातील चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर आमदार तांबेंची मागणी

सिद्धार्थ मेनन, ओंकार भोजने, तेजस राऊत आणि भाग्यश्री लिमये हे चार मित्र या टीझरच्या केंद्रस्थानी आहेत. तिघांचं आयुष्य अगदी मोकळं आणि बिनधास्त सुरू असतानाच त्यांच्या जगात नेमकं काय घडतंय, याची उत्सुकता टीझर निर्माण करतो. चौघांचे स्वभाव, स्टाईल वेगळी आहे; पण एकत्र आल्यावर त्यांच्या आयुष्यात सुरू होणारी धमाल मात्र एकच! त्यांचे संवाद, त्यांचं वागणं आणि वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये त्यांची होणारी धावपळ पाहाताना हा गोंधळ नेमका कुठे जाऊन पोहोचणार, अशी उत्सुकता निर्माण होते.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मंत्री आदिती तटकरेंच्या हस्ते ‘लग्न आणि बरंच काही’ चे मंत्रालयात पोस्टर अनावरण

या चार मित्रांच्या विश्वात भाग्यश्री लिमये ही चित्रपटाची नायिका म्हणून दिसतेय. त्यातच सयाजी शिंदे यांची भूमिका विशेष लक्ष वेधून घेते. या व्यतिरिक्त यात अंशुमन विचारे, वैष्णवी अंधाडे आणि अश्विनी काळसेकर यांचीही झलक दिसतेय. एकंदरच, या चित्रपटात अनेक नामवंत कलाकारांची मांदियाळी असून ‘मांजर’ हा एक मल्टिस्टारर चित्रपट ठरणार आहे. त्यामुळे या कलाकारांच्या भन्नाट अभिनयातून प्रेक्षकांना मनोरंजनाची एक वेगळी आणि धमाल मेजवानी अनुभवायला मिळणार आहे.

Haiwaan : सैफ अली खानचा ‘हैवान’ मधील भावनिक अंदाज समोर

टीझरमध्ये दिसणारी चार मित्रांची धमाल, त्यांच्यातली केमिस्ट्री आणि त्यांच्यासोबत घडणारा गोंधळ हा चित्रपटाच्या मनोरंजनाची झलक दाखवतो. टीझर संपता संपता ऐकू येतो तो चक्क मांजराचा आवाज! हा आवाज मात्र या धमाल विश्वाशी मांजराचा नेमका कसा संबंध आहे, याची उत्सुकता वाढवतो. मांजर हा या चित्रपटाशी जोडलेला एक मजेशीर आणि उत्सुकता वाढवणारा घटक ठरत आहे.

Video : ‘महाराष्ट्राची ओळख मुंबई अन् फडणवीसांमुळे’ अमेरिकन राजदूतही फडणवीसांचा जबरा फॅन

दिग्दर्शक सुशील महादेव म्हणतात, ‘’’मांजर’ची सुरुवातच एका मजेशीर कल्पनेतून झाली. चार मित्रांचं आयुष्य, त्यांचा स्वभाव आणि त्यांच्यातली मैत्री या सगळ्याभोवती कथा फिरते. सिद्धार्थ, ओंकार, तेजस आणि भाग्यश्री यांच्यासोबत काम करताना या चौघांची केमिस्ट्री खूप छान जमली. चौघेही वेगळ्या स्वभावाचे आहेत आणि त्यामुळे ते एकत्र असताना प्रत्येक प्रसंगात काहीतरी नवीन घडत राहातं. या चित्रपटात विनोद आहे, गोंधळ आहे, मैत्री आहे आणि त्यासोबत धमाल मनोरंजनही आहे. प्रेक्षकांनी ही मैत्री, हे पात्र आणि त्यांच्यासोबत घडणारा गोंधळ अनुभवावा, अशीच आमची इच्छा आहे. ‘मांजर’ हा सर्व वयोगटातील प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा चित्रपट आहे.”

Tumbbad 2 च्या रेकीत मिळाला जुन्या ‘तुम्बाड’ चा ठेवा; वर्षांनंतर सापडले चित्रीकरणात वापरलेले मूळ साचे

एचथ्रीओ मोशन पिक्चर्स आणि जस्ट राईट फिल्म्स निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन सुशील महादेव यांनी केलं आहे. हर्ष, अविनाश शर्मा, हरि राजपूत, बंटी नागी आणि जसबीर नागी यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाच्या वितरणाची धुरा एए फिल्म्सने सांभाळली आहे. येत्या १८ सप्टेंबर २०२६ रोजी ‘मांजर’ चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

follow us