चेक बाऊन्स प्रकरण अन् थेट मुक्काम पोस्ट तिहार जेल! राजपाल यादवचं नक्की काय चुकलं?
Rajpal Yadav नं चेक बाउन्स प्रकरणात तिहार जेलमध्ये आत्मसमर्पण केलं. आपल्याकडं पैसे नसल्यानं भावूक झाल्याचं देखील पाहायला मिळालं.
Cheque bounce case and direct stay post Tihar Jail! What exactly went wrong with Rajpal Yadav : बॉलीवूड चित्रपटांमध्ये आपल्या दमदार विनोदी भूमिकांच्या जोरावर प्रेक्षकांना पोट धरुन खळखळून हसवणाऱ्या राजपाल यादवच्या आयुष्यात सध्या रडवणारे क्षण सुरु आहेत. सध्या तो चांगलाच अडचणीत सापडलाय. नुकतंच त्यानं चेक बाउन्स प्रकरणात तिहार जेलमध्ये आत्मसमर्पण केलं. राजपाल यादवनं आत्मसमर्पण करण्यापूर्वी आपल्याकडं पैसे नसल्यानं ओढवलेल्या परिस्थिवरुन भावूक झाल्याचं देखील पाहायला मिळालं.
रोहित पवारांच्या दाव्याला हिंदुरावांचा दुजोरा; शेवटच्या क्षणी का घेतला विमान प्रवासाचा निर्णय?
आता झालं काय की, 2 फेब्रुवारीला राजपाल यादवला आत्मसमर्पण करण्याचा आदेश दिल्ली उच्च न्यायालयानं दिला. राजपालच्या वकिलानं न्यायालयाला माहिती दिली की, त्यानं 50 लाख रुपयांची व्यवस्था केली, पण पैसे भरण्यासाठी एका आठवड्याची वेळ मागितली. मात्र, न्यायमूर्ती स्वरण कांता शर्मा यांनी राजपाल यादवची मुदत वाढवण्याची विनंती फेटाळून लावली. त्यानंतर राजपालनं नुकतंच तिहार जेलमध्ये आत्मसमर्पण केलं. आत्मसमर्पण केल्यानंतर, सध्या तो तिथं त्याची शिक्षा भोगतोय.
जगपति बाबूंचा वाढदिवस ‘पेड्डी’ टीमकडून खास शुभेच्छा; ‘अप्पलासूरी’ भूमिकेबाबत उत्सुकता वाढली
न्यायालयानं दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर राजपालनं एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, या कठीण प्रसंगी जेव्हा राजपाल यादव यांनी माझ्याकडे आता पैसेही नाहीत आणि सोबत मित्रही नाहीत अशी हतबलता व्यक्त केली. त्यानंतर आता अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी मदतीचा हात पुढं केलाय. आणि आर्थिक मदत करण्याचंही जाहीर केलंय. त्याचवेळी राजपालच्या मदतीला सोनू सूद पुढं आलाय. राजपाल यादवची भावनिक प्रतिक्रिया पाहून सोनू सूदनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली.
अहमदाबाद विमान अपघात : पायलटने जाणूनबुजून…इटालियन वृत्तपत्राचा दाव्याने खळबळ…
त्यात सोनू सूदनं फक्त शाब्दिक आधार दिला नाही तर आर्थिक मदतीचं आश्वासनही दिलं. सोनू सूदनं राजपाल यादव आपल्या आगामी चित्रपटात काम देण्याचंही जाहीर केलंय. त्याचा चित्रपट लिखाणाच्या प्रक्रियेत असला तरी, सोनूनं राजपालला सायनिंग अमाऊंट देण्याचा निर्णय घेतलाय. दुसरीकडं जेम ट्यून्स म्युझिकचे मालक आणि संगीत निर्माता राव इंद्रजित यादव यांनी राजपाल यादवला 1.11 कोटी रुपयांची आर्थिक मदत केलीय.
‘शरारत’ लाँचची खास आठवण सांगत क्रिस्टल म्हणाली, म्हणूनच रणवीर…
त्याचं झालं असं की, 2010 मध्ये राजपाल यादवनं ‘अता पता लापता’ नावाच्या चित्रपटासाठी मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडकडून 5 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. पण म्हणतात ना बशिबच*** तर काय करील पांडू… राजपालचा ‘तो’ चित्रपट फ्लॉप झाला. त्यामुळं राजपाल यादवचं मोठं नुकसान झालं अन् अर्थातच त्याच्यावर कर्ज झालं. आणि आर्थिक संकटात सापडलेला राजपाल कर्ज काही फेडूच शकला नाही.
राजपालने दिलेले अनेक चेक बाउन्स झाले, ज्यामुळं कर्ज देणाऱ्यांनी कायदेशीर कारवाई केली. एप्रिल 2018 मध्ये, एका दंडाधिकारी न्यायालयानं राजपाल यादव आणि त्यांच्या पत्नीला कलम 138 अंतर्गत दोषी ठरवलं आणि त्यांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. अभिनेत्यानं या निकालाला आव्हान दिलं आणि दिलासा मागितला. पण हा खटला अनेक वर्षांपासून सुरू आहे, त्यामुळं थकबाकीची रक्कम व्याजासह जवळपास 9 कोटी रुपये झाली.
दिल्ली उच्च न्यायालयाकडून आत्मसमर्पणाचे आदेश…
मध्यंतरी राजपाल यादवनं त्याचं काही कर्ज फेडलंही. 2025 मध्ये त्यानं तब्बल 75 लाखांचं कर्ज फेडलं. पण वारंवार पैसे देण्यास उशीर आणि मुदत चुकवल्यामुळं न्यायालयानं त्याच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. कर्ज फेडण्याबद्दल राजपाल गंभीर नसल्याचं कोर्टानं म्हटलं. त्यानंतर 4 फेब्रुवारी 2026 रोजी न्यायमूर्ती स्वरण कांता शर्मा यांनी पैशाची व्यवस्था करण्यासाठी एका आठवड्याची मुदतवाढ देण्याची राजपाल यादवची विनंती फेटाळून लावली. वारंवार मुदत वाढवून देता येत नसल्याचं स्पष्ट करत न्यायालयानं त्याला आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले, अन् मागच्या गुरुवारी राजपालनं आत्मसमर्पण केलंय.
