Salman Khan: भाईजानच्या सुरक्षेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “सलमानला भारतात… “

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 02T125347.131

Devendra Fadnavis On Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खान म्हणजे भाईजान (Salman Khan) धमक्या मिळणं अजूनही थांबले नाही. त्याला गेल्या काही दिवसांपूर्वी धमकीचा मेल (Threatening mail) आला होता. त्यानंतर त्याची सुरक्षा वाढवण्यात आली. त्यानंतर त्याने एका मुलाखतीत भाईजान म्हणाला होता की, मुंबईपेक्षा दुबईमध्ये मी सुरक्षित आहे. आता भाईजानच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, भाईजानला भारतात पूर्ण सुरक्षा देण्यात आली आहे.

धमकीप्रकरणानंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Bhaijaan) म्हणजे भाईजानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. या धमक्यांमुळे दबंग भाईजानने दुबई सुरक्षित आहे. पण सुरक्षेची समस्या भारतात येते, असे एका मुलाखतीत सांगितलं होत. त्यावर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,”भाईजानला मुंबईत किंवा भारतात कुठेही अडचण येणार नाही. त्याला पूर्ण सुरक्षा देण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)


नेमक काय म्हणाला भाईजान ?

भाईजान म्हणालेला,मला धमक्यांची भीती वाटत नाही. वाय प्लस सुरक्षेमुळे मी सुरक्षित आहे. दुबई खूप सुरक्षित आहे. पण इंडियाच्या सुरक्षेची समस्या येत आहे. मला सांगितेल्या नियमाचे पालन करण्याचा मी प्रयत्न करत आहे. प्रत्येक पाऊल सावधगिरीने टाकावं लागत आहे.

Wrestlers Protest: कुस्तीपटूंना अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचे समर्थन, मदत करण्याची केली विनंती

काय आहे नेमकं प्रकरण ?

लॉरेन्स बिश्नोई धमकीप्रकरणानंतर भाईजानला पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. याआधी धमक्यांविषयी भाईजान म्हणाला होता,”धमक्यांकडे जास्त लक्ष दिलं तर त्या धमकी देणाऱ्या व्यक्तीकडे जास्त लक्ष देत आहोत असं होईल, हे अत्यंच चुकीचं असणार आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीला मी काही म्हणालो तर त्याच्या प्लॅनमध्ये तो अधिक यशस्वी होणार आहे. मी धमक्यांना घाबरणारा नाही. जेव्हा जे व्हायचं तेव्हा ते होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

Tags

follow us