‘आऊट ऑफ सिलॅबस – पुस्तकांच्या पलीकडे’च्या भव्य प्रीमियरला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची हजेरी

Out of Syllabus – Beyond Books याचा भव्य विशेष प्रीमियर शो नुकताच आयोजित करण्यात आला. याकडे विशेष लक्ष लागले होते.

Out Of Syllabus – Beyond Books

Dignitaries from various fields attend the grand premiere of ‘Out of Syllabus – Beyond Books’ : तरुणाईचा संघर्ष, शिक्षण व्यवस्थेतील वास्तव आणि सकारात्मक सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारा आगामी मराठी चित्रपट ‘आऊट ऑफ सिलॅबस – पुस्तकांच्या पलीकडे’ याचा भव्य विशेष प्रीमियर शो नुकताच आयोजित करण्यात आला. या सोहळ्याकडे चित्रपटसृष्टीसह सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि उद्योग क्षेत्राचे विशेष लक्ष लागले होते. चित्रपटाची संपूर्ण टीम तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या सोहळ्याला उपस्थित राहून चित्रपटाला शुभेच्छा दिल्या.

‘सुलतान’ च्या सेटवरील सलमान खानच्या वन-टेक मॅजिकबद्दल दिग्दर्शक अली अब्बास जफरचा मोठा खुलासा 

Adu-Tishu Production & Music प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि चित्रपट निर्माते डॉ. सुगत ग्यानेश्वर वाघमारे यांनी केली असून, आमदार डॉ. संजय कुटे हे चित्रपटाचे सह-निर्माते आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन नवीन देशबोनिया यांनी केले असून, लेखन अनिकेत रामचंद्र कोरडे यांचे आहे. तर चित्रपटाच्या संकलनाची जबाबदारी अनिल विठ्ठल थोरात यांनी उत्तमरित्या सांभाळली आहे. पुस्तकांच्या चौकटीपलीकडे जाऊन आयुष्याकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देणारा हा चित्रपट तरुण पिढीला प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे. या खास सोहळ्याला चित्रपटातील अजिंक्य राऊत, अद्वयी वाघमारे, शेषपाल गनवीर, अभिजीत रामचंद्र आणि सानिका थोरसकर हे कलाकार उपस्थित होते. कलाकारांनी प्रेक्षकांशी संवाद साधत चित्रपटाच्या निर्मितीतील अनुभवही यावेळी शेअर केले.
केतन अग्रवाल प्रकरणात पोलिसांना मोठा धक्का; सिया अन् चेतनला न्यायालयीन कोठडी

या विशेष प्रीमियर सोहळ्याला National Stock Exchange चे Managing Director आणि CEO श्री. आशिष चौहान यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच मा. आ. संजय कुटे (जळगाव जामोद), मा. आ. रणधीर सावरकर (अकोला पूर्व), मा. आ. हरीश पिंपळे (मूर्तीजापूर, अकोला), मा. आ. नारायण कुचे (बदनापूर), मा. आ. किसन वानखडे (उमरखेड, यवतमाळ), मा. आ. वसंत खंडेलवाल (वि. प. सदस्य), मा. आ. हेमंत पाटील (नांदेड) आणि मा. आ. श्वेता महाले (चिखली) यांच्यासह चित्रपटसृष्टी, राजकारण, समाजकारण, उद्योग आणि विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. त्यामुळे हा प्रीमियर एक भव्य, दिमाखदार आणि संस्मरणीय सोहळा ठरला.

Maharashtra Rain Alert : पुढील 3 दिवस राज्यात अतिवृष्टीचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी

समाजाभिमुख आशय, प्रेरणादायी कथा आणि तरुणांना नवी दिशा देणारा संदेश यामुळे ‘आऊट ऑफ सिलॅबस – पुस्तकांच्या पलीकडे’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आला आहे. प्रीमियरला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि मान्यवरांची उपस्थिती यामुळे चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, हा चित्रपट तरुणाईसह सर्व वयोगटातील प्रेक्षकांच्या मनात नक्कीच स्थान निर्माण करेल, असा विश्वास चित्रपटाच्या संपूर्ण टीमने व्यक्त केला आहे.

follow us