Dimple Kapadia: सनी देओलच्या आधी राजेश खन्नाला डेट करत होती डिंपल कपाडिया

  • Written By: Published:
WhatsApp Image 2023 06 08 At 11.17.43 AM

Happy Birthday Dimple Kapadia: अभिनेत्री अमृता सिंहने सनी देओल (Sunny Deol) आणि डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) यांच्या अफेअरविषयी धक्कादायक खुलासा केला होता. (Sunny Deol Dimple Kapadia Affair) बॉबी या सिनेमातून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात करणारी अभिनेत्री म्हणजे डिंपल कपाडिया. त्यांनी ‘बॉबी’, ‘सागर’, ‘रुदाली’, आणि ‘राम लखन’ यांसारख्या सिनेमामध्ये काम करत चाहत्यांची चांगलीच मने जिंकली आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dimple Kapadia (@dimplekapadia__)


आज ८ जून रोजी तिचा वाढदिवस आहे. डिंपल यांनी वयाची ६५ वर्ष ओलांडली असली तरी, त्या सिनेमासृष्टीमध्ये सक्रिय आहेत. चला मग आज त्यांच्या वाढदिवशी जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही खास गोष्टी. डिंपल कपाडिया यांनी वयाच्या १६ व्या वर्षी राजेश खन्ना यांच्याबरोबर लग्न केले होते. मात्र त्यांचा संसार खूप काळ काही टिकला नाही. त्यांनी लग्नाच्या १० वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर डिंपल कपाडीया यांचे नाव अभिनेता सनी देओलशी जोडण्यात आले होते.

‘अर्जुन’, ‘मंजिल-मंजिल’, ‘आग का गोला’, ‘गुनाह’ आणि ‘नरसिम्हा’ अशा सिनेमामध्ये सनी आणि डिंपलने एकत्र स्क्रीन शेअर केले होते. पण त्यांच्या अफेअरच्या चर्चा खूपच सुरु झाले होते, जेव्हा त्या दोघांच्या अफेअरची चर्चा सुरु झाली होती, त्यावेळेस ते दोघेही विवाहित होते. अनेकदा ते दोघे एकत्र फिरत असताना देखील दिसले होते. जेव्हा डिंपलची बहिण सिंपलचे निधन झाले, तेव्हा सनी तेथे पोहोचला होता. त्याने डिंपलचे सांत्वन केले होते.

Kriti Senon: क्रितीने मंदिरातच केला दिग्दर्शकाला Kiss; पुजाऱ्यांचा संताप, म्हणाले…

ट्विंकल खन्ना आणि रिंकी खन्ना सनी छोटे बाबा म्हणून आवज देत असल्याच्या देखील चर्चा मोठ्या प्रमाणात रंगल्या होत्या. सनीला डिंपलशी लग्न करायचे होते. पण सनीची पत्नी पूजाने त्याला धमकी दिली होती, जर असे काही झाले तर मुलांना घेऊन लांब निघून जाणार असल्याचे देखील तिने सांगितले होते. त्यामुळे कुटुंब वाचवण्यासाठी सनीने लांब राहण्याचे ठरवले होते. डिंपल आणि सनीने कुटुंबीयांसाठी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र २०१७ साली मोनाकोमध्ये ते पुन्हा एकत्र असल्याचे दिसले होते. त्यांचे एकत्र फिरतानाचे फोटो सोशल मीडियावर सतत व्हायरल होत होते.

Tags

follow us