इंडी चित्रपटांपासून भव्य युद्धनाट्यांपर्यंत – दिग्दर्शक राजा कृष्ण मेनन यांचा कौतुकास्पद सिनेमॅटिक प्रवास !

चित्रपटनिर्माते, लेखक आणि दिग्दर्शक राजा कृष्ण मेनन यांच्यासाठी सिनेमा हा वास्तववादी, सखोल संशोधनावर आधारित कथांचा आधार आहे.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 08 06T141739.195

Director Raja Krishna Menon’s commendable cinematic journey! : उत्कृष्ट कथाकथन केवळ एखाद दृश्य टिपत नाही तर ते मानवी जिद्दीची धडधडही टिपते आणि अश्यातच चित्रपटनिर्माते, लेखक आणि दिग्दर्शक राजा कृष्ण मेनन यांच्यासाठी सिनेमा हा वास्तववादी, सखोल संशोधनावर आधारित कथांचा आधार आहे. ते कायम त्यांचा कथा मधून रांगड्या वास्तववादाचा आणि भव्य सिनेमॅटिक मांडणीचा समतोल साधतात यात शंका नाही.

राजा मेनन यांच्या प्रवासाची सुरुवात “बस यूँ ही” (2002) या स्वतंत्र चित्रपटाने झाली ज्यात नंदिता दास आणि पूरब कोहली यांनी भूमिका साकारल्या होत्या. 2009 मध्ये “बाराह आना” या खडतर, व्यक्तिरेखाकेंद्रित कथेद्वारे त्यांनी वास्तववादाची ही शैली अधिक परिपक्व केली आणि या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये विशेष दखल मिळवली.

एकनाथ शिंदे किती दिवस डबल ढोलकी वाजवणार? 25-30 आमदार पाडणार; मनोज जरांगे भडकले

समकालीन हिंदी चित्रपटसृष्टीत राजा कृष्ण मेनन हे कायम वेगळे ठरतात आणि याची गोष्ट म्हणजे मोठ्या ऐतिहासिक घटनांना अत्यंत मानवी भावनांमध्ये रुजवण्याची त्यांची क्षमता ! त्यांचा महत्त्वपूर्ण चित्रपट “एअरलिफ्ट” ( 2016) या चित्रपटात त्यांनी वास्तविक भू-राजकीय संकटाचे रूपांतर सामान्य माणसाच्या असामान्य धैर्याच्या थरारक आणि भावनिक विजयकथेत केले. त्यानंतर “शेफ” ( 2017) मध्ये त्यांनी कौटुंबिक नात्यांच्या जिव्हाळ्याच्या जगात सहजपणे प्रवेश केला आणि मग “पिप्पा” (2023) द्वारे 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान ब्रिगेडियर बलराम सिंह मेहता यांच्या प्रवासाचे प्रभावी पुनर्कथन सादर करत पुन्हा इतिहास भव्यपणे पडद्यावर जिवंत केला.

जीवनातील हलक्या-फुलक्या विनोदी प्रसंगांच्या गोष्टी असो आत्मशोधाचा वैयक्तिक प्रवास असो किंवा उच्च जोखमीची युद्धकथा असो राजा मेनन सातत्याने आपल्या पात्रांची जिद्द आणि भावविश्व अधोरेखित करतात. विचारप्रवर्तक स्वतंत्र सिनेमाचा प्रवास सहजपणे ते प्रेक्षकांपर्यंत पोहचवतात. मुख्य प्रवाहातील मनोरंजनाचा दुवा ते यशस्वीपणे साधतात आणि हे सिद्ध करतात की सर्वात प्रभावी कथा त्या असतात ज्या खऱ्या मानवी सत्यात रुजलेल्या असतात.

follow us