दिग्दर्शक राम गोपाल वर्मांना 3 महिन्यांचा तुरुंगवास, नेमकं काय आहे प्रकरण?

  • Written By: Published:
दिग्दर्शक राम गोपाल वर्मांना 3 महिन्यांचा तुरुंगवास, नेमकं काय आहे प्रकरण?

Ram Gopal Verma : दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Verma) हे कायमच त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच अडचणीत आलेत. आताही ते एका मोठ्या अडचणीत सापडले. चेक बाऊन्सप्रकरणी (Check bounce) मुंबईतील एका न्यायालयाने राम गोपाल वर्मा (Ram Gopal Verma) यांना तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. ‘सिंडिकेट’ या नवीन चित्रपटाच्या घोषणेच्या एक दिवस आधीच न्यायालयाचा हा निर्णय दिला.

अधिकारीच निघाले करोडपती; छाप्यात सापडलं मोठं घबाड, नोटा मोजण्यासाठी थेट मशीनच मागवलं 

हे प्रकरण २०१८ मधील आहे. अखेर मंगळवारी अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टाने या प्रकरणाचा निकाल दिला. मात्र हा निकाल ऐकण्यासाठी राम गोपाल वर्मा हे न्यायालयात उपस्थित नव्हते. निकालाच्या दिवशी आरोपी गैरहजर असल्याने, त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करावं आणि संबंधित पोलिस ठाण्यातून अटक करावी, असे आदेश न्याय दंडाधिकाऱ्यांनी दिले. राम गोपाल वर्मा यांना भारतीय दंड संहितेच्या कलम 138 अंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे.

नेमकं प्रकरण काय?
२०१८ मध्ये महेशचंद्र मिश्रा यांच्यामार्फत श्री नावाच्या कंपनीने दिग्दर्शकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. चेक बाउन्स प्रकरणी त्यांनी हा गुन्हा दाखल झाला होता. हा खटला वर्मा यांच्या ‘कंपनी’ या फर्मशी संबंधित होता. या कंपनीअंतर्गत त्यांनी ‘सत्या’, ‘रंगीला’, ‘कंपनी’ आणि ‘सरकार’ यासारखे चित्रपट बनवले होते. मात्र गेल्या काही वर्षांत त्यांचे चित्रपट फक्त थिएटरमध्येच प्रदर्शित झाले आहेत. त्यातच कोविड महामारीच्या काळात ही कंपनी आर्थिक संकटात होती. यामुळे त्यांना त्यांचं कार्यालय देखील विकावं लागलं होतं.

दिग्दर्शक राम गोपाल वर्मांना 3 महिन्यांचा तुरुंगवास, नेमकं काय आहे प्रकरण? 

दरम्यान, या प्रकरणात राम गोपाल वर्मा यांना जून २०२२ मध्ये न्यायालयाने ५,००० रुपयांच्या जामीनदार जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता.मात्र आता इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, न्यायालयाने राम गोपाल वर्मा यांना तीन महिन्यांत तक्रारदाराला ३ लाख७२ हजार२१९ रुपये भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत. नुकसान भरपाई न दिल्यास त्यांना आणखी तीन महिने तुरुंगवास भोगावा लागेल, असंही कोर्टाने म्हटलं.

या प्रकरणी दिग्दर्शकाविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला आहे. राम गोपाल वर्मा यांना लवकरच अटक केली जाईल असे पोलिसांचे म्हणणे आहे.

राम गोपाल वर्मा हे हिंदी आणि तेलगू चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. त्यांनी १९८९ मध्ये ‘शिवा’ या तेलुगू क्राइम थ्रिलर चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube