Don 3 : किंग खान नाही तर डॉन 3 नाही.. फरहान अख्तरवर भडकले चाहते !

Don 3 : किंग खान नाही तर डॉन 3 नाही.. फरहान अख्तरवर भडकले चाहते !

Don 3: शाहरुख खान म्हणजेच सर्वांचा लाडका किंग खानच्या (Shah Rukh Khan) डॉन 2 (Don 2) सिनेमानंतर चाहते डॉन 3 या सिनेमाची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत असल्याचे पाहायला मिळत होते. नुकताच फरहान अख्तरनं (Farhan Akhtar) सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत त्याच्या नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. हा व्हिडीओ बघितल्यावर डॉन-3 हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे का? असा सवाल सध्या विचारला जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar)


फरहान अख्तरने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्या व्हिडीओत ३ हा आकडा पाहायला मिळत आहे, तसेच A NEW ERA BEGINS असं लिहिलेलं बघायला मिळत आहे. हा व्हिडीओ बघितल्यावर चाहत्यांनी असा अंदाज लावत आहेत की, फरहाननं डॉन-3 या सिनेमाची घोषणा केली आहे. डॉन-3 या सिनेमामध्ये किंग खानला रणवीर सिंह रिप्लेस करणार असलयाचे सांगितले जात आहे. यामुळे आता फरहान अख्तरने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताच चाहते त्याच्यावर चांगलच भडकल्याचे पाहायला मिळत आहे.

फरहाननं शेअर केलेल्या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. डॉन-3 मध्ये रणवीर सिंह हा किंग खानला रिप्लेस करणार आहे, अशी सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे किंग खानशिवाय डॉन 3 हा सिनेमा होऊ शकत नाही, असे नेटकऱ्यांचे परखड मत स्पष्ट करत आहे. एका चाहत्याने फरहाननं शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट केली, ‘थोडी लाज बाळगा, किंग खानसोबत हा सिनेमा का केला नाही? तर दुसऱ्या चाहत्याने कमेंट केली – ‘नो एसआरके नो डॉन.’

Kirkol Navre: नवं कोरं धम्माल विनोदी नाटक “किरकोळ नवरे”

मिळालेल्या माहितीनुसार ‘डॉन 3’ मध्ये रणवीर सिंह मुख्य भूमिका साकारणार असल्याची घोषणा लवकरच केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. डॉन 3 चे निर्माते गदर 2 आणि OMG 2 च्या रिलीजसह डॉन 3 सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्याचा विचार करत आहेत. तसेच २००६ साली डॉन सिनेमाचा पहिला रिमेक प्रदर्शित करण्यात आला होता. ज्यामध्ये किंग खान आणि प्रियांका चोप्रा हे मुख्य भूमिकेमध्ये दिसून येणार आहेत. हा सिनेमा सुपरहिट ठरला. ५ वर्षांनंतर २०११ मध्ये डॉन २ प्रदर्शित करण्यात आला. जो चाहत्यांना मोठ्या प्रमाणात आवडला होता. हे दोन्ही सिनेमा फरहान अख्तरने दिग्दर्शित केल्याचे पाहायला मिळाले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube