अलिया-रणवीरचा ‘Rockey Or Rani ki Prem Kahani’ चित्रपट संकटात, चित्रपटातील संवादांवर सीबीएफसीची कात्री…
अभिनेत्री अलिया भट्ट आणि अभिनेता रणवार सिंगच्या आगामी चित्रपटाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. रणवीर आणि अलियाचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट 28 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याआधीच चित्रपट अडचणीत सापडला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) या चित्रपटाचं पुनरावलोकन केलं असून चित्रपटातील संवादावर आक्षेप घेतला आहे. सीन्समधील संवाद बदलण्याबाबत सीबीएफसीने बदल सुचविले आहेत.
वृत्तानूसार, चित्रपटात अनेक वेळा वापरण्यात आलेला ‘बी डी’ हा अपमानजनक शब्द ‘बेहेन दी’ ने बदलण्यात आला आहे, तर रम ब्रँड ओल्ड मॉंकच्या जागी ‘बोल्ड मॉन्क’ वापरण्यात आला आहे. सध्या या चित्रपटाचं प्रमोशन सुरु आहे. वृत्तानूसार चित्रपटात अनेक वेळा ‘बी डी’ हा अवमानजनक शब्द बेहेन दो असा वापरण्यात आला आहे. तसेच ‘रम ब्रँड ओल्ड मॉंक’च्या जागी ‘बोल्ड मॉन्क’ हा शब्द वापरण्यात आला आहे.
Pankaja Munde : ‘पंकजांना भाजपमध्ये जास्त त्रास झाला तर’… भाऊ जानकरांचा निर्वाणीचा इशारा
तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे निर्देश करणारा सीनही कट करण्यात आला आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटाला बुधवारी सेन्सॉर प्रमाणपत्र मिळाले. हा चित्रपट 2 तास 48 मिनिटांचा आहे.
गुजरातमध्ये पावसाचे थैमान, पुरात म्हशी, गाड्या गेल्या वाहून, धक्कादायक VIDEO व्हायरल
चित्रपटामध्ये फॅमिली ड्रामा दाखवण्यात आला असून आलिया भट्ट, रणवीर सिंग, जया बच्चन, धर्मेंद्र आणि शबाना आझमी चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. याचे दिग्दर्शन करण जोहरने केले आहे. या चित्रपटाचे लेखन इशिता मोईत्रा, शशांक खेतान आणि सुमीत रॉय यांनी केले आहे. चित्रपटात रणवीर सिंग एका व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे.
दरम्यान, आलिया भट्ट प्रामाणिक ऑडिटर्सच्या कुटुंबातील बंगाली मुलीच्या भूमिकेत असणार आहे. या सिनेमात नाटकासोबतच कॉमेडी आणि रोमान्सचा तडकाही दाखवण्यात आला आहे.