कष्ट टाळू मुख्यमंत्री ते ‘कष्टाळू’ मुख्यमंत्री; पीएम मोदींच्या भेटीनंतर श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
Shrikant Shinde On Uddhav Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहपरिवार भेट घेतली. या भेटीवर विरोधकांनी जोरदार टीका केली तर पीएम मोदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तोंडभरुन कौतुक केले. त्यावरुन आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी हटके ट्वीट करत माजी मुख्यमंत्री उद्वव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. कष्ट टाळू मुख्यमंत्री ते कष्टाळू मुख्यमंत्री; महाराष्ट्राचा बदलता राजकीय प्रवास असं ट्वीट करत ठाकरेंवर निशाणा साधला आहे.(shrikant Shinde criticize on Uddhav Thackeray PM Modi meets Eknath shinde shivsena BJP)
Pankaja Munde : ‘पंकजांना भाजपमध्ये जास्त त्रास झाला तर’… भाऊ जानकरांचा निर्वाणीचा इशारा
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांचा संपूर्ण परिवार बरोबर होता. त्यावरुन विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणाही साधला. मात्र पंतप्रधान मोदींनी मात्र मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीनंतर मराठीतून ट्वीट करत भेटीची माहिती दिली.
कष्ट टाळू मुख्यमंत्री
ते ‘कष्टाळू’ मुख्यमंत्री….महाराष्ट्राचा बदलता राजकीय प्रवास!#Shivsena #EknathShinde #NarendraModi #DrShrikantEknathShinde@narendramodi @mieknathshinde pic.twitter.com/p05JKZsKYT
— Dr Shrikant Eknath Shinde (@DrSEShinde) July 23, 2023
मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्राचे गतिशील आणि कष्टाळू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणि त्यांच्या कुटुंबाला भेटून आनंद झाला. महाराष्ट्रासाठीची त्यांची तळमळ आणि विनम्र स्वभाव कौतुकास्पद असल्याचेही पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
Jayant Patil : अजितदादांनी दिला बक्कळ निधी; जयंत पाटील म्हणाले, मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर याची माहिती ट्वीटद्वारे दिली होती. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, देशाचे पंतप्रधान म्हणून कणखर सक्षम असलेल्या नरेंद्र मोदी यांनी आज माझे वडील, पत्नी, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे, सून आणि नातू यांच्यासह मला सदिच्छा भेटीला बोलावून आपलेपणाने विचारपूस केली. माझ्या कुटुंबाशी निवांत गप्पा मारल्या, असं ट्वीट मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं आहे.
पीएम मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुकही केले. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये गतिशील आणि कष्टाळू मुख्यमंत्री असंही म्हटलं आहे. त्यावरुनच आता मुख्यमंत्री शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी एक हटके ट्वीट करत माजी मुख्यमंत्री उद्वव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.
खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या ट्वीटमध्ये कष्ट टाळू मुख्यमंत्री ते कष्टाळू मुख्यमंत्री… महाराष्ट्राचा बदलता राजकीय प्रवास! असं ट्वीट करत उद्धव ठाकरेंचं नाव न घेता हल्लाबोल केला आहे. त्यावर आता शिवसेना ठाकरे गटाकडून या ट्वीटला काय उत्तर मिळणार हे पाहावं लागणार आहे.